शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यशाची वाट शोधायची असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:19 IST

मानवी जीवनात सुख-दु:ख, यशापयश या दोन्हीही गोष्टी आहे. म्हणूनच जीवनाला अर्थ आहे, अन्यथा जीवन नीरस झाले असते. संकटे, अपयश यांनी खचून न जाता जीवनात यशाची वाट शोधायची असते.

ठळक मुद्देअनिल मंत्री : सरस्वती विद्यालयात बक्षीस वितरण थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : मानवी जीवनात सुख-दु:ख, यशापयश या दोन्हीही गोष्टी आहे. म्हणूनच जीवनाला अर्थ आहे, अन्यथा जीवन नीरस झाले असते. संकटे, अपयश यांनी खचून न जाता जीवनात यशाची वाट शोधायची असते. विद्यार्थ्यानी चांगले चरित्र निर्माण करावे, ज्यांना यश मिळाले त्याचे अभिनंदन व ज्यांना अपयश आले जे बक्षीसाचे मानकरी ठरले नाहीत त्यांनी दु:खी न होता पुन्हा मोठ्या जोमाने प्रयत्न करुन यशापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन संस्थेचे सचिव तथा प्राचार्य अनिल मंत्री यांनी केले.सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती विद्यानिकेतन प्राथ. शाळा, सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट, जीएमबी इंग्लीश मिडीयम हायस्कूलच्या संयुक्त वार्षिकोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, उपाध्यक्ष विजय कापगते, तहसीलदार सी.आर.भंडारी, संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाश भैय्या, संस्था सदस्य तथा नगरपंचायत सदस्य सर्वेश भुतडा, गटशिक्षणाधिकारी टी.बी.भेंडारकर, पर्यवेक्षिका विना नानोटी, जीएमबीचे मुख्याध्यापक मुकेश शेंडे, एसडीसीच्या प्राचार्य सुनिता डांगे, सरीता शुक्ला, संयोजक के.के.लोथे, प्रा.इंद्रनिल काशीवार, विष्णू चाचेरे, विद्यार्थी प्रतिनिधी जयेश रुखमोडे, सोनल साखरे उपस्थित होते.याप्रसंगी नगराध्यक्ष शहारे यांनी, विद्यार्थ्याची प्रतिरुपी बाग ही शाळा असते, विद्यार्थी आपल्या उत्तुंग बुद्धीच्या बळावर ज्ञानप्राप्ती करतात, आजचे विद्यार्थी हे भविष्याचे शिल्पकार आहेत. मोठे होण्यासाठी वर्तमान पत्राच्या पुरवण्यांचे वाचन करा व यश मिळवा असे मत व्यक्त केले.गटशिक्षणाधिकारी भेंडारकर यांनी, मानवी जीवनात बक्षीस हे अमूल्य आहे. प्रगतीसाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. पश्चात पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. संचालन अर्चना गुरनुले व ज्ञानेश्वर रोकडे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.