शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोवर-रु बेला लसीकरणामध्ये सुटलेल्या मुलांचा शोध घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:35 IST

गोवर रुबेला मोहिमेचा लाभ पालकांनी घेवून आपल्या मुला-मुलींना गोवर रूबेला हे दोन्ही रोग होण्यापासून वाचवावे. यंत्रणांनी या मोहिमेला शंभर टक्के यशस्वी करण्याकरीता शाळा व अंगणवाडीतील व शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून गोवर रु बेला लसीकरणाचे प्रमाण वाढवावे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, दुसरा टप्पा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोवर रुबेला मोहिमेचा लाभ पालकांनी घेवून आपल्या मुला-मुलींना गोवर रूबेला हे दोन्ही रोग होण्यापासून वाचवावे. यंत्रणांनी या मोहिमेला शंभर टक्के यशस्वी करण्याकरीता शाळा व अंगणवाडीतील व शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून गोवर रु बेला लसीकरणाचे प्रमाण वाढवावे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी त्या बोलत होत्या.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. ई.हाश्मी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. अनंत चांदेकर उपस्थित होते. चांदेकर यांनी मोहिमेला यशस्वी करण्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या सर्व घटनाक्रमांचा आढावा सभेत सादर केला. ९ महिने ते १५ वर्षापर्यंत जवळपास ३ लाख ६५,९५८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शाळेत लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले. यात ९० टक्के पेक्षा कमी लसीकरण झालेल्या शाळा ३५५, ९१ टक्के पेक्षा जास्त लसीकरण झालेल्या शाळा ७५७, शंभर टक्के लसीकरण झालेल्या शाळा ३५२ आहेत. सुटलेल्या शाळेतील मुलांना उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रु ग्णालय व जिल्हा रु ग्णालयात कव्हर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.३ लाख ६५ हजार ९५८ पैकी ५४ डिसेंबर २०१८ पर्यंत २ लाख ७५ हजार १८७ लाभार्थी कव्हर झाल्याची माहिती बैठकीत दिली.सभेला डब्ल्यू.एच.ओ.चे जिल्हा समन्वयक डॉ.एफ.ए.मेश्राम, आदिवासी विकास प्रकल्प सहायक अधिकारी व्ही. तितीरमारे, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.निर्मला जयपुरीया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.डब्ल्यू वंजारे, डॉ.विवेक येळे यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक ए.एस.वंजारी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी