शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाशिवाय आर्थिक, सामाजिक क्रांती अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:48 IST

शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजचा तरूण उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे. त्याला सर्वार्थाने स्वयंपूर्ण व मजबूत बनविण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण

ऑनलाईन लोकमतअर्जुनी-मोरगाव : शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजचा तरूण उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे. त्याला सर्वार्थाने स्वयंपूर्ण व मजबूत बनविण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणाने मानवाच्या ज्ञानकक्षा रूंदावतात. माणूस अधिक प्रगल्भ बनतो व तो जबाबदारीने वागतो. पुस्तकांचे निरंतर वाचन हे आपल्या सुखी व उज्ज्वल भविष्याची दिशा ठरविणारी असते. त्यामुळे पुस्तके वाचावी. शिक्षणाने सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, बौद्धिक क्रांती घडविता येते, असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी तथा गोंदिया जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.ते येरंडी-दर्रे येथील बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात बोलत होते.उद्घाटन डी.एम. सोयाम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी चेतन उईके, शीला उईके, गोवर्धन ताराम, सरपंच शहारे, मधू बिहारी, मंजुषा चंद्रिकापुरे, ईश्वार आदी मंचावर उपस्थित होेते.चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, जोपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही तोपर्यंत प्रगती साधता येत नाही. युवकांनी इतरांची मोलमजुरी करण्यापेक्षा शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करावे. पालकांनी आपल्या पाल्यांना शिकवावे. बिरसा मुंडा यांनी शिक्षण घेतले व बंड करुन उठले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, दोन आणे जर असतील तर एक आण्याची भाकर व दुसऱ्या आण्याची पुस्तक घ्या. भाकर तुमची भूक भागवेल व पुस्तक जीवन जगवायला शिकवेल, असे विचार त्यांनी व्यक्त केले.या वेळी इतर अतिथींनीसुध्दा मार्गदशन केले. संचालन काटंगे यांनी केले. प्रास्ताविक मधू बिहारी यांनी मांडले. आभार उपसरपंच वाढवे यांनी आभार मानले.