शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर धरणाच्या पाळीवरील वृक्षतोड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 22:34 IST

इटियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील वाढलेल्या झाडांमुळे पाळीला धोका निर्माण होण्याची शक्यता लोकमतने २० मार्चच्या अंकात प्रकाशित केली होती. हे वृत्त प्रकाशित होताच इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागात खळबळ माजली.

आॅनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : इटियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील वाढलेल्या झाडांमुळे पाळीला धोका निर्माण होण्याची शक्यता लोकमतने २० मार्चच्या अंकात प्रकाशित केली होती. हे वृत्त प्रकाशित होताच इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागात खळबळ माजली. अखेर धरणाच्या पाळीवरील वृक्षतोडीला शनिवारी सुरुवात करण्यात आली. २० ते २५ फूट उंचीची झाडे होईपर्यंत ही बाब विभाग तसेच धरण सुरक्षा विभागाच्या निदर्शनास कशी आली नाही? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असून यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.यासंदर्भात इटियाडोह संरक्षण, संवर्धन समितीचे श्रीधर हटवार यांनी २६ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या धरण सुरक्षा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना तक्रार केली होती. या तक्रारीनंतरच हे बिंग फुटले होते. या विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितापणामुळे पाळीवर सुमारे २० ते २५ फूट उंचीची झाडे वाढली. वेळोवेळी वृक्ष तोड झाली असती तर ऐवढी मोठी झाडे झालीच नसती. धरण व कालवे क्षेत्रातील वाढणाºया झाडांची कत्तल करण्यासाठी निधीच उपलब्ध होत नसल्याचे तुणतुणे वाजवितात. त्यामुळे शासन व प्रशासनाचे अशा गंभीर बाबींकडे लक्षच नाही हे यातून सिद्ध होते.हटवार यांनी केलेल्या तक्रारीत अनेक वर्षांपासून पाळीवरील झाडे कापलेली नाहीत. वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे पाळीची जमीन पोखरुन धरणाचे पाणी झिरपेल व यामुळे पाळीला धोका निर्माण होऊ शकतो. ही झाडे सुमारे २० ते २५ फूट उंचीची असून यासंदर्भात धरण सुरक्षा विभागाला मार्गदर्शन मागविले होते. मात्र त्यांनी मार्गदर्शन करण्याऐवजी पावसाळा पूर्व २०१४ ते पावसाळा उत्तर २०१७ मध्ये निरीक्षण केल्याचे स्पष्ट केले. या अहवालात धरणाच्या पाळीवर झाडे वाढलेली नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात नाशिकच्या कार्यकारी अभियंत्यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश इटियाडोह पाटबंधारे विभागाला १२ मार्च रोजी दिले आहेत.या पाळीवर सुमारे २० ते २५ फूट उंचीची झाडे आहेत. ही पावसाळा उत्तर २०१७ चे नंतर अवघ्या ६ महिन्यात ऐवढी मोठी कशी होऊ शकतात. याचा अर्थ वारंवार सादर होणारा तपासणी अहवाल संशयास्पद आहे. याची योग्य ती चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.