शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

हॉट मिक्स डांबर प्लांटवर अखेर जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 21:54 IST

लोकमतच्या पाठपुराव्यानंतर तहसीलदार विनोद मेश्राम यांनी सोमवारी (दि.२०) सायंकाळी ६ वाजता गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांटला भेट देऊन ज्प्तीची कारवाई केली. या कारवाईचे सर्वच स्तरावरुन कौतूक केले जात आहे. या धडक कारवाईमुळे अवैध काम करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देलोकमतच्या पाठपुराव्याला यश : तहसीलदारांनी केली जप्तीची कारवाई, ग्रामपंचायतही आली अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : लोकमतच्या पाठपुराव्यानंतर तहसीलदार विनोद मेश्राम यांनी सोमवारी (दि.२०) सायंकाळी ६ वाजता गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांटला भेट देऊन ज्प्तीची कारवाई केली. या कारवाईचे सर्वच स्तरावरुन कौतूक केले जात आहे. या धडक कारवाईमुळे अवैध काम करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.सोमलपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत मौजा गंगेझरी येथील शासकीय भूमापन क्रं.१६ मधील १.१० हे.आर.जागेपैकी ०.६० जागेवर हे डांबर प्लांट परवानगी न घेता थाटण्यात आले होते. निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या सिरेगावबांध तलावाच्या अगदी शेजारी या प्लांटची निर्मिती करण्यात आली होती. यामुळे जैवविविधता, विदेशी पक्ष्यांच्या मुक्त संचारात बाधा, वन्यजीवरांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला होता. या प्लांटमुळे ध्वनी व वायू प्रदुषण होऊन पर्यावरण धोक्यात आले होते.यासंदर्भात लोकमतने ९ मे च्या अंकात डांबर प्लांटमुळे पर्यावरणाला धोका या मळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खळाडून जागे झाले होते व विविध विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली होती. लोकमतने यासंदर्भात आणखी सखोल चौकशी केली असता हा प्लांट ग्रामपंचायत सोमलपूरचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच महाराष्टÑ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रमाणपत्राच्या आधारावर अंकीत फत्तेसिंह चव्हाण यांनी सुरु केले होते. ही जागा शासन मालकीची असतांनाही ग्रामपंचायतने २५ हजार रुपये प्रतीवर्ष प्रमाणे भाडे तत्वावर एका करारनाम्याद्वारे दिली होते. हे वास्तव लोकमतने २० मे रोजी वृत्त प्रकाशित उघडकीस आणले होते. लोकमतच्या सततच्या पाठपुराव्यानंतर महसूल प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला. आधी नायब तहसीलदार एम.यु.गेडाम यांनी याप्रकरणाची चौकशी केली होती तर पंचायत समितीतर्फे विस्तार अधिकारी (पंचायत) राजू वलथरे यांनी चौकशी केली. सोमवारी (दि.२०) तहसीलदार विनोद मेश्राम यांनी मौका स्थळी भेट दिली व सर्व साहित्याच्या जप्तीची कारवाई केली. ही जप्ती फत्तूसिंह राणप्रताप चव्हाण गोंदिया यांच्याकडून करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यात १३ चक्का ट्रक क्रमांक एमएच ३१-सीक्यू ६०२९, १० चक्का टिप्पर क्रमांक एमएच ४०-वाय ९५३३, जेसीबी क्रमांक एमएच ३५ जी ५२११, एक मोठा जनरेटर, एक मोठी अ‍ॅपल कंपनीची हॉट मिक्स मशीन, एक मोठा अंदाजे १४४ चौ. फुट टिनाचा शेड, १४० नग रिकामे डांबर ड्रम, २३ नग भरलेले डांबरी ड्रम, अंदाजे १४ बिट्ट्या जळाऊ लाकूड, एक आॅपरेटर मशिन कंट्रोल रुम कॅबीन, एक इलेक्ट्रीक मोटरसह असलेला हातपंप, २७ आंबा, ६ पळस, ९ सागवान, १ जांभुळ व ३७ आंजन झाडे जप्त करण्यात आली.जप्त केलेले सर्व साहित्य फत्तूसिंह राणाप्रताप चव्हाण यांना जिथे गरज भासेल तिथे हजर करण्याच्या अटीवर सुपूर्त करण्यात आले आहे. मंगळवारी तहसीलदार मेश्राम यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र देऊन प्लांट परिसरात असलेल्या फळझाडांचे व जमिनीच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई होय.नियमानुसार कारवाई होणारपरवानगी न घेता डांबर प्लांटची उभारणी करणाºयावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. प्लांट मालकावर जागेच्या केलेल्या नुकसानीदाखल दंड आकारणी केली जाईल. या जागेवर उभे असलेले डांबर प्लांट काढून घेण्याच्या संबंधाने वरिष्ठांची परवानगी घेऊन ती प्रक्रिया पार पाडली जाईल. अशी माहिती तहसीलदार विनोद मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना दिली.ग्रामपंचायत संकटातयाप्रकरणात वर्तमानपत्रातून होणाºया सततच्या भडीमारामुळे सोमलपूर ग्रामपंचायतने १७ मे रोजी प्लांट मालक अंकीत चव्हाण यांना पत्र देऊन बंद करावा असे आदेश दिले. मात्र प्लांट मालकाने पलटवार करुन आपण पाच वर्षासाठी करार केला आहे. त्यामुळे होणाºया नुकसानीची भरपाई द्यावी असे प्रत्युतर दिल्याने ग्रामपंचायत संकटात सापडली आहे. शासनाची जागा ग्रा.पं.ने करारनाम्याद्वारे कशी भाड्याने दिली याचा अहवाल तयार करुन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाठविण्याचे आदेश पाठविण्यात आल्याची माहिती आहे.यावरुन सोमलपूर ग्रा.पं.चे सरपंच, ग्रामसेवक व ग्रा.पं.सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. याप्रकरणात पुढे काय होणार याची उत्सुकता सिगेला पोहचली आहे.