शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गोदामाला सील ठोकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:26 IST

आधारभूत हमी भाव धान खरेदी योजनेंतर्गत येथील आदिवासी विविध सेवा संघ केंद्रावरील गोदामाला नवेगावबांधच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी सील ठोकले. ही कारवाई सोमवारी (दि.२४) सायंकाळी करण्यात आली.

ठळक मुद्देधान खरेदीतील अनियमितता : उपप्रादेशिक व्यवस्थापकांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : आधारभूत हमी भाव धान खरेदी योजनेंतर्गत येथील आदिवासी विविध सेवा संघ केंद्रावरील गोदामाला नवेगावबांधच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी सील ठोकले. ही कारवाई सोमवारी (दि.२४) सायंकाळी करण्यात आली.येथे आदिवासी विकास महामंडळाने सेवा सह संस्थेला धान खरेदी केंद्र दिले. या केंद्रावर शेतकरी धान विक्रीला आणतात. डिसेंबर रोजी केंद्रावर धान मोजणी सुरु असताना शेतकऱ्याला शंका आली. त्या शेतकºयाने दुबार मोजणी केली असता प्रत्येक पोत्यात ४५ ते ४६ किलो धान होते. त्यादिवशी धान विक्री केलेल्या प्रत्येक शेतकºयांच्या ५-५- पोत्यांची मोजणी केली असता त्यात अधिकचेच धान आढळून आले.शेतकºयांनी लागलीच नवेगावबांध येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक राहूल पाटील यांना तक्रार केली असता त्यांनी लगेच येथील केंद्र गाठले. त्यांनी पडताळणीसाठी काही पोत्यांचे वजन करण्यास सांगितले असता वजन ४५ ते ४६ किलो भरले. परत शेतकºयांनी गोदामातील खरेदी झालेल्या धानाचे वजन करण्याचा आग्रह केला. त्यात सुद्धा अनियमितता आढळून आली. यावरुन या केंद्रावर सुरुवातीपासूनच खरेदी झालेल्या धानात सह.संस्थेच्या संचालक मंडळाशी संगनमत करुन शेतकºयांची लूट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.यासंदर्भात दै. लोकमतने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. याची चौकशी करुन शेवटी या केंद्राच्या गोदामाला सोमवारी (दि.२४) सील ठोकण्यात आले. यावेळी भंडाराचे प्रादेशिक व्यवस्थापक एस.एस. अंबडकर, नवेगावबांधचे उपप्रादेशिक व्यवस्थापक राहूल पाटील व आदिवासी सेवा सह. संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.आज आम्ही संस्थेत जावून कारवाई केली. काही नागरिकांचे बयान घेतले व धान खरेदी गोदामाला सील लावले असून पुढची कारवाई सुरू आहे. चार दिवसांपासून येथे खरेदी बंद आहे. वरिष्ठांकडून आदेश आल्यावर धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश देता येईल.- राहूल पाटीलउपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, नवेगावबांध.