शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जुनी पेन्शनचा मुद्दा राजकीय पटलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:12 IST

मागील १५ वर्षापासून लुप्त असलेला कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनचा मुद्दा अखेर राजकीय पक्षांच्या पटलावर चिन्हीत झाला असून सध्या होऊ घातलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी जुनी पेंशनचा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील १५ वर्षापासून लुप्त असलेला कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनचा मुद्दा अखेर राजकीय पक्षांच्या पटलावर चिन्हीत झाला असून सध्या होऊ घातलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी जुनी पेंशनचा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश केला आहे.शासकीय कर्मचाऱ्यांना संविधानाच्या कलमान्वये सुरु असलेली १९६२ व १९८४ ची पेंशन योजना २००४ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने बंद केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २००४ पासून तर महाराष्ट्रातील कर्मचाºयांना १ नोव्हेंबर २००४ पासून तर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २००५ पासून १९८२ ची जुनी पेंशन योजना नाकारुन नवीन परिभाषीत अंशदायी पेंशन योजना लागू करण्यात आली. इतर राज्यातही नवीन पेशंन योजना लादण्यात आली.याविरोधात तत्कालीन कर्मचारी संघटनांनी विरोध न दर्शविल्याने राजकीय पक्षांचे याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र २०१५ पासून राज्यात वितेश खांडेकर व देशात विजय बंधू यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी मोर्चे उभारुन नवीन पेंशन योजनेला तीव्र विरोध दर्शविला.सदर विरोध व कर्मचाऱ्यांचा तीव्र आक्रोश लक्षात घेता राजकीय पक्षांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या अनुषंगाने विविध राज्यात राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. दिल्लीतील आप सरकारने संख्याबळ दाखवून जुनी पेंशन योजना देण्याचे घोषीत केले आहे.२६ नोव्हेंबरला दिल्लीत आयोजित संसद मार्चनंतर आप सरकार कर्मचाºयांना जुनी पेंशन लागू करण्याचे संकेत दिले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सुध्दा जुनी पेंशन विषयी सकारात्मकता दर्शविल्याने राज्य शासनाद्वारे लवकरच पेन्शन विषयक कर्मचारी हिताचे निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये आप पक्षाने कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करण्याच्या मुद्दा त्यांचा जाहिरनाम्यात घेतला आहे.जुनी पेन्शन मुद्दा जाहीरनाम्यातसध्या सुरू असलेल्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने घोषित केलेल्या निवडणुक जाहीरनाम्यात २००४ नंतरच्या सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्याचा समावेश केला आहे.संसद मार्च २६ नोव्हेंबरला२००४ नंतर शासकीय सेवेत रूजू असलेल्या कर्मचाऱ्यांना १९६२ व १९८४ ची जुनी पेंशन योजना लागू करा या मागणीसाठी २६ नोव्हेंबर संविधान दिनी संसद मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. यात कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, जिल्हाध्यक्ष राज कडव, सचिन राठौड,प्रवीण दसार, संदीप सोमवंशी, मुकेश रहांगडाले, महेंद्र चव्हाण, सुभाष सोनेवाने, सचिन घोपेकर, शीतल कनपटे,जयेश लिल्हारे, संतोष रहांगडाले, जीवन म्हशाखेत्री, भूषण लोहारे, सुनील चौरागडे यांनी कळविले आहे.