शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तेंदुपत्ता बोनस मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:06 IST

४२ गावातील तेंदूपत्ता कामगारांचे बोनस अद्याप मिळाले नव्हते. लाभधारकांनी वनविभागाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वाचा फोडली. अखेर तेंदूपत्ता संकलन केंद्रावरील लाभधारकांच्या बोनसचे आदेश निघाले असून वाटप प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : ४२ गावातील तेंदूपत्ता कामगारांचे बोनस अद्याप मिळाले नव्हते. लाभधारकांनी वनविभागाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वाचा फोडली. अखेर तेंदूपत्ता संकलन केंद्रावरील लाभधारकांच्या बोनसचे आदेश निघाले असून वाटप प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.अर्जुनी-मोरगाव वनक्षेत्र कार्यालयांतर्गत ४२ गावातील ३५७३ तेंदूपत्ता लाभधारकांचे गत दोन वर्षापासून २ कोटी ६ लाख रुपये थकीत होते. बोनसच्या प्रतिक्षेत प्रदीर्घ कालावधी निघून गेल्यानंतर लाभधारकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर ‘लोकमत’ने २४ फेब्रुवारी रोजी ‘तेंदूपत्ता मजूर तीन वर्षापासून बोनसच्या प्रतिक्षेत’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची वनविभागाने दखल घेत बोनसची रक्कम मंजूर केली. वडेगाव, खामखुर्रा येथील लाभधारकांना बोनसचे वितरण करण्यात आले. उर्वरित गावातील लाभधारकांचे धनादेश काढण्यात आले असून त्याची वितरण प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी दिली.खामखुर्रा येथील धनादेश वितरणप्रसंगी वनपाल प्रविण केळवतकर, निप्पल बरय्या, अरविंद खुणे, क्रिष्णा पारधी, अशोक ठाकरे, मनोहर सोनवाने, भूकेश गजापुरे, टेकचंद जांभुळकर, कनिराम नंदेश्वर, ज्ञानेश्वर मिसार, जनार्धन कोड्डे, बळीराम दूनेदार, शामराव ठाकरे, प्रशांत जांभुळकर, परसराम जांभुळकर, महादेव जांभुळकर, प्रफुल बडोले व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :forest departmentवनविभाग