शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST

तिरोडा : तालुक्यात सिंचन क्षेत्रात मोठी क्रांती होत असतानाच त्यात आता भर घालणाऱ्या निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाला वन्यजीव विभागाची मंजुरी ...

तिरोडा : तालुक्यात सिंचन क्षेत्रात मोठी क्रांती होत असतानाच त्यात आता भर घालणाऱ्या निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाला वन्यजीव विभागाची मंजुरी मिळाली आहे. यामुळे येत्या ६ महिन्यांत या प्रकल्पाचे काम सुरू होणार असून धापेवाडा उपसा सिंचन टप्पा- १ व २ सोबतच निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाद्वारे १८ गावांतील ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

तालुक्यात सिंचन क्षेत्रात धडाक्याने कामे सुरू आहेत. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-१ चे पाणी खळबंदा जलाशयात सोडून लाभक्षेत्रात १०१७१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. त्याचबरोबर धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ करिता २९० कोटी रुपये फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत मंजूर करवून २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जलपूजन करून पाईपलाईनच्या कामाला सुरुवात आली. आतापर्यंत ८० टक्के काम प्रगतीवर असून त्याचबरोबर भुराटोला लघु मध्यम प्रकल्पाकरिता २१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सन १९७२ पासून २००६ पर्यंत निमगाव येथील आंबेनाला येथे प्रकल्पाला सुरू करण्याकरिता अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. आमदार विजय रहांगडाले यांनी सन २०१५ पासून टप्याटप्प्याने निमगाव प्रकल्पाला मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. महाराष्ट्र शासनाद्वारे वन्यजीव विभागाच्या प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचा ३१ कोटींचा एफआरए निधी शासनास भरणा करण्यात आला. हा प्रकल्प नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असल्यामुळे १० किलोमीटर अंतरातील प्रकल्पास वन्यजीव मंडळाच्या मंजुरीकरिता मे २०२० मध्ये पाहणी करून ११ फेब्रुवारी २०२० रोजी ३१.७१ लक्ष व १६ फेब्रुवारी २०२१ रोजी १२.९२ लक्ष रुपये असे एकूण ४४.६३ लक्ष प्रकल्प यंत्रणेस भरण्यात आले आहे. वन्यजीव विभागाच्या मंजुरीच्या सर्व बाबी पूर्ण झाल्याने व या प्रकल्पाकरिता नाहरकत मिळाल्याने हा प्रकल्प येत्या ६ महिन्यांत सुरू होणार आहे. यामुळे धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-१ व २ सोबतच निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाद्वारे १८ गावांतील ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.