शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मूर्र्तींना दिला जातोय ‘फायनल टच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:12 IST

आता गणरायांच्या आगमनाला काहीच तास शिल्लक असल्याने शहरात एकच गर्दी व सर्वांना लगबग दिसून येत आहे. शहरातील काही मंडळ गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे देखावे व मूर्ती या मोठ्या बजेटच्या राहत असल्याने ही सर्व कामे आटोपण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते धावपळ करीत असताना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । उद्या गणरायांचे आगमन,गणेशोत्सव मंडळाची लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मांगल्याचे देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची धावपळ वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. तर काही मोठ्या मंडळांच्या मूर्तींचे शहरात आगमन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, वेळेवर मूर्तींचे आॅर्डर पूर्ण करण्यासाठी मूर्तीकारांचे रात्रीला जागून काम सुरू असून ते मूर्तींना ‘फायनल टच’ देताना दिसून येत आहेत.सोमपासून (दि.१) गणेशोत्सवाला प्रारंभ होतोय. शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी व सार्वजनिक गणपतींची स्थापना केली जाते. परिणामी गणरायांचे हे १० दिवस नवचैतन्याने बहरलेले असतात.यामुळेच गोंदिया शहरातील गणेशोत्सवाची जिल्ह्यातील काय लगतच्या छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यांतही ख्याती आहे. मात्र आता गणरायांच्या आगमनाला काहीच तास शिल्लक असल्याने शहरात एकच गर्दी व सर्वांना लगबग दिसून येत आहे. शहरातील काही मंडळ गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे देखावे व मूर्ती या मोठ्या बजेटच्या राहत असल्याने ही सर्व कामे आटोपण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते धावपळ करीत असताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, काही मंडळांच्या मूर्ती छत्तीसगड राज्यात तयार होतात.त्यामुळे गणेश मंडळ आपल्या मूर्ती आणण्यासाठी रवाना झाले असून मूर्तींचे आगमन सुरू झाले आहे. तर मंडपांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कारागिर दिवसरात्र एक करून कामाला लागले आहेत.गणराज येणार असल्याने महिला वर्गही घराच्या साफसफाई व डेकोरेशनला लागल्या आहे.तसेच गणरायांना १० दिवस कोणता नैवेद्य लावायचा व मोदकांच्या तयारीत व्यस्त दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या सर्व लगबगीत मुर्तीकारही मागे नाही.त्यांनी घेतलेले मूर्तींचे आॅर्डर पूर्ण करण्यासाठी मूर्तीकार आपल्या परिवारासह डोळ््यात तेल घालून काम करीत आहेत. तसेच आपल्या मूर्तींची तयारी पूर्ण करवून घेण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते मूर्तीकारांकडे तळ ठोकून बसले आहेत. मूर्तीकारांचे बस्तान सध्या येथील सिव्हील लाईन्स परिसरात असल्याने सिव्हील लाईन्स परिसर आतापासूनच गजबजून गेला आहे.साहित्यांच्या दुकानांत गर्दीगजाननाला सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दुकानांनी बाजारपेठ सज्ज आहे. या दुकानांत सध्या आपल्या घरच्या मूर्तींसाठी तसेच सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींच्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी दिसून येत आहे.गणेशोत्सव काही तासांवर असल्याने सर्वच आतापासून खरेदीला लागले असून यामुळे शहर गजबजून गेले आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सव