शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘एडवेंचर स्पोर्टस्’मध्ये भर

By admin | Updated: January 25, 2016 03:10 IST

सालेकसा तालुक्यातील हाजराफॉल येथे ‘एडवेंचर स्पोर्ट्स’ च्या माध्यमातून जिल्हा पर्यटन समितीने पर्यटकांसाठी एक विशेष भेट

कपिल केकत ल्ल गोंदियासालेकसा तालुक्यातील हाजराफॉल येथे ‘एडवेंचर स्पोर्ट्स’ च्या माध्यमातून जिल्हा पर्यटन समितीने पर्यटकांसाठी एक विशेष भेट दिल आहे. त्यात मात्र आता भर पडणार असून आणखी काही विविध स्पोटर््स त्यात जोडले जाणार आहेत. जिल्हा पर्यटन समितीकडून यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आली असून लवकरच यासाठीची कामे सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक तरूणांच्या माध्यमातूनच या ‘एडवेंचर स्पोटर््स’चा पर्यटकांना आनंद लुटता येणार आहे. सालेकसा तालुकास्थळापासून सुमारे आठ कि.मी. अंतरावरील कोसमतर्रा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेले हाजराफॉल हे पर्यटन स्थळ वनविभागाच्या अखत्यारित येते. हाजराफॉल जरी पर्यटकांना आकर्षीत करीत असले तरी काही तासांचा विरंगुळा केल्यानंतर दिवस घालविण्यासाठी येथे दुसरे असे काहीच नव्हते. अशात पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात अवघा दिवस घालविता यावा या दृष्टीकोनातून हाजराफॉल येथे ‘एडवेंचर स्पोटर््स’ सुरू करण्याची संकल्पना वन विभागाचे उप वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगांवकर यांना सुचली व त्यांनी ‘एडवेंचर स्पोटर््स’चा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत असलेल्या जिल्हा पर्यटन समितीकडे मांडला होता. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनाही आवडला व त्यांनी याला लगेच मंजूरी दिली होती. ३६ लाखांच्या या प्रोजेक्ट अंतर्गत मागील वर्षी बरमा ब्रिज, पॅरेलल ब्रिज, नेट क्रॉसिंग, रॅपलींग हे क्रीडा प्रकार येथे सुरू करण्यात आले होते. यासाठी जवळील ग्राम नवाटोलावासीयांची वन व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली व त्यांच्याच माध्यामातून हाजराफॉलची आता देखभाल केली जात आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत आता हाजराफॉल मध्ये आणखीही क्रीडा प्रकारांची भर घातली जाणार आहे. यासाठी जिल्हा पर्यटन समितीने निधी उपलब्ध करवून दिला असून यासाठीचे कार्यादेश मुंबईच्या अलाईड एडवेंचर स्पोर्ट यांना देण्यात आले आहे. लवकरच या कामांना सुरूवात होणार असल्याची माहिती आहे.सर्व कारभार वन व्यवस्थापन समितीकडे ४हाजरा फॉलकडे वन विभागाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळाचा विकास होऊ शकला नाही. विशेष म्हणजे वन विभाग याकडे सातत्याने लक्ष देऊ शकत नसल्याने स्थानिक लोकांच्या माध्यमातूनच याचा विकास साधण्यासाठी वन विभाग प्रयत्नरत आहे. यामुळे इको-डेव्हलपमेंट अंतर्गत नवाटोला येथे वन व्यवस्थापन समिती गठित करून त्यांच्या मार्फत सध्या या स्थळाची स्वच्छता, व्यवस्थापन व अनैतिक प्रकारांवर आळा घालण्याचे कार्य केले जात आहे. वन विभागाच्या परित्रकानुसार वन व्यवस्थापन समितीला पर्यटकांकडून शुल्क आकारण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. पुढेही हाजरा फॉलच्या माध्यमातून येणारे उत्पन्न वन व्यवस्थापन समितीकडेच राहणार असून त्यातूनच समितीला या स्थळाचा विकास व देखरेख व अन्य खर्च वहन करायचे आहेत. तसेच येथील लोकांच्या हाताला यातूनच काम उपलब्ध होणार आहेत.