शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नऊ दुकानदारांवर गुन्हा दाखल, नियमांचे उल्लघंन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 05:00 IST

भाजीपाला ठेवून विक्री करण्याकरिता फिरवितानी मिळालेल्या भाजी विक्रेत्यावर पोलीस हवालदार उईके यांनी गुन्हा दाखल केला आहे. सातवी कारवाई दुपारी ४.२० वाजता आमगावच्या कामठा चौकात करण्यात आली. एका हॉटेलचालकाने आपले हॉटेल सुरू ठेवल्यामुळे  पोलीस शिपाई सुरेद्र लांजेवार यांनी कारवाई केली आहे. आठवी कारवाई सालेकसा पोलिसांनी केली आहे. गिरोला येथे सायंकाळी ७ वाजता किराणा दुकान सुरू ठेवणाऱ्या आरोपीवर  पोलीस नायक सुमेध चंद्रिकापुरे यांनी कारवाई केली आहे. 

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे दुर्लक्ष : पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ७ ते ११ या काळात दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश दिला. या काळात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व कोरोनासंदर्भात देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून आपण आपला व्यवसाय करू शकता, असा आदेश दिला असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखवून दुकाने सुरू ठेवणाऱ्या नऊ दुकानदारांवर गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांनी ४ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. यात गोरेगाव पोलिसांनी ४ गुन्हे, आमगाव पोलिसांनी ३ गुन्हे, सालेकसा व चिचगड प्रत्येकी एक गुन्हा असे नऊ गुन्हे दाखल केले आहेत.  गोरेगाव पोलिसांनी पुराना बाजार चौक गोरेगाव येथील आरोपी किराणा दुकानदाराने  नियमांचा भंग करीत दुकान सुरू ठेवल्याने सहायक फौजदार पवार  यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम १८८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  दुसरी कारवाई गोरेगाव तालुक्याच्या मुंडीपार येथील पेट्रोलपंप समोर करण्यात आली. चटई टाकून चष्मा विक्री करणाऱ्या एकावर  पोलीस हवालदार राखडे यांनी कारवाई केली आहे. तिसरी कारवाई बोटे येथील दुकानदारावर  आहे.  पोलीस हवालदार तिलगाम  यांनी कारवाई केली आहे. चवथी कारवाई तिल्ली मोहगाव येथील आहे. आरोपीने चिकन सेंटर येथे तोंडाला मास्क न लावता, सॅनिटायझर, हात धुण्याचे पाणी, साबणाची कोणतीही व्यवस्था न करता दुकान सुरू ठेवले होते. ही कारवाई पोलीस शिपाई मल्लेवार यांनी केली आहे. पाचवी कारवाई आमगाव  पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आली.  कामठा चौक सालेकसा रोड आमगाव येथे आरोपीने मनीहारी ठेल्यात साहित्य विक्री करण्याकरिता फिरविताना व सार्वजनिक ठिकाणी लोकांना गोळा केल्याने पोलीस हवालदार उईके यांनी कारवाई केली आहे. सहावी कारवाई दुपारी ३.१५ वाजता तुकडोजी चौक आमगाव येथे करण्यात आली. भाजीपाला ठेवून विक्री करण्याकरिता फिरवितानी मिळालेल्या भाजी विक्रेत्यावर पोलीस हवालदार उईके यांनी गुन्हा दाखल केला आहे. सातवी कारवाई दुपारी ४.२० वाजता आमगावच्या कामठा चौकात करण्यात आली. एका हॉटेलचालकाने आपले हॉटेल सुरू ठेवल्यामुळे  पोलीस शिपाई सुरेद्र लांजेवार यांनी कारवाई केली आहे. आठवी कारवाई सालेकसा पोलिसांनी केली आहे. गिरोला येथे सायंकाळी ७ वाजता किराणा दुकान सुरू ठेवणाऱ्या आरोपीवर  पोलीस नायक सुमेध चंद्रिकापुरे यांनी कारवाई केली आहे. नववी कारवाई  चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उचेपूर येथे करण्यात आली. दुपारी १२.४० वाजता खुल्या जागेत भाजीपाल्याचे दुकान लावले. मास्क न लावता भाजी विक्री करीत असल्यामुळे त्याच्यावर ५०० रुपये दंड आकारला; परंतु त्याने दंड भरण्यास नकार दिल्याने  पोलीस शिपाई रवी जाधव यांच्या तक्रारीवरून  चिचगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्व प्रकरणातील आरोपींवर भादंविच्या कलम १८८ २६९,२७०, सहकलम ५१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  तपास पोलीस नायक गंगापारी करीत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस