लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : दिल्ली येथील जतंरमंतरवर ९ आॅगस्टला काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रती जाळल्या. तसेच संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी संविधान सन्मान बचाव कृती समितीने केली आहे.या मागण्यासाठी १ सप्टेंबरला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विविध संघटनांनी एकत्र येवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा संकल्प केला आहे. दरम्यान संविधानाच्या प्रती जाळून संविधानाचा अवमान करणाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवराम कुंभरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. त्यानंतर यश अध्यापक विद्यालय अर्जुनी मोरगाव येथे तालुक्यातील विविध समाज, राजकीय संघटनेच्या पदाधिकाºयांची बैठक पार पडली. या बैठकीत १ सप्टेबरला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीला सोनदास गणवीर, प्रा.प्रदीप भानसे, डॉ. भारत लाडे, संभाजी ब्रिगेडचे उद्धवराव मेहंदळे, ओबीसी संघटनेचे मनोहर शहारे, प्रा. भगवंत फुलकरवार, व्यंकट खोब्रागडे, आदिवासी संघटनेचे लक्ष्मीकांत मडावी, मधुकर कुंभरे, शिला उईके, यशवंत सोनटक्के, नाना शहारे, भोजराम रहिले, रतीराम राणे, अजय अंबादे, आर.के.जांभुळकर उपस्थित होते.
त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 21:57 IST
दिल्ली येथील जतंरमंतरवर ९ आॅगस्टला काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रती जाळल्या. तसेच संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
ठळक मुद्देसंविधान सन्मान बचाव कृती समिती : १ सप्टेंबरला तहसील कार्यालयवर मोर्चा