शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बोगस नोंद प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST

गोंदिया : नगर परिषदेंतर्गत गुंठेवारीची नोंद करून यानंतर ते प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले जातात. या दोन्ही विभागांनी कर आकारणी ...

गोंदिया : नगर परिषदेंतर्गत गुंठेवारीची नोंद करून यानंतर ते प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले जातात. या दोन्ही विभागांनी कर आकारणी केल्यानंतर सातबारा तयार केला जातो. मात्र, बोगस गुंठेवारीची नोंद करून प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले जातात. हे प्रकरण उघडकीस येऊनसुध्दा नगर परिषदेने पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गोंदिया येथील तीन नागरिकांनी गुंठेवारीची खोटी कागदपत्रे तयार केली आणि त्यावर अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून गुंठेवारी नियमानुकूल करण्यासाठी तहसील कार्यालयकडे पाठविली होती. हे प्रकरण नगररचना विभागाने मंजूर केल्याचेसुध्दा त्यात दाखवण्यात आले. जी गुंठेवारी तिन्ही प्रकरणे मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविली होती, त्यातील फाईलवर गुंठेवारी आदेश क्र. नपगो / १४ / २०२० असे नमूद आहे. मात्र, ज्या भुखंडांचे क्रमांक नोंद करण्यात आले आहेत, त्याचा अभिलेखामध्ये शोध घेतला असता त्याची कुठेही नोंद नाही. तसेच आवक जावक क्रमांकाचीसुध्दा त्यात नोंद नाही. त्यामुळे हे गुंठेवारीचे आदेश बनावट स्वाक्षरी आणि शिक्के मारुन तयार केल्याचा ठपका ठेवला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदियाच्या शिष्टमंडळाने नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण व नगररचना सभापती बंटी पंचबुध्दे यांना निवेदन देऊन या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मुकेशकुमार मिश्रा, शहर अध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष क्षितीज वैद्य, शहर उपाध्यक्ष रजत बागडे, सौरभ गौतम व मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.