शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

फाईल पुढे सरकतच नाही

By admin | Updated: August 23, 2014 01:55 IST

राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना आहेत. परंतु त्या योजनेची फलश्रुती योग्य अंमलबजावणीवर असते. घरकुल योजनेचे तालुक्यात जवळपास अडीच ते तीन हजार लाभार्थी असण्याचे सांगितले जाते.

अमरचंद ठवरे बोंडगावदेवीराज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना आहेत. परंतु त्या योजनेची फलश्रुती योग्य अंमलबजावणीवर असते. घरकुल योजनेचे तालुक्यात जवळपास अडीच ते तीन हजार लाभार्थी असण्याचे सांगितले जाते. परंतू प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आणि नंतर अनुदान मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कटकटीमुळे लाभार्थी त्रस्त झाले आहेत.जवळपास ७० हजार रुपयांचे अनुदान या योजनेंतर्गत लाभार्थ्यांस दिले जाते. त्यातून एक टुमदार निवास बनुन सर्वसामान्य कुटुंबाला त्यामध्ये वास्तव्य करण्याची संधी प्राप्त होते. अनुदानाची राशी प्राप्त करुन घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांस पंचायत समिती कार्यालयाच्या वारंवार पायऱ्या झिजवाव्या लागतात. त्याचबरोबर आर्थिक बळाचे वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जातच नाही, अशी कैफियत घरकुल लाभार्थ्यांनी व्यक्त केली.पंचायत समितीच्या बांधकाम विभागामार्फत घरकुल लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण केले जाते. पंचायत समितीच्या आवारात नित्यदिन घरकुल लाभार्थ्यांची झुंबड पाहायला मिळते. तालुक्यातील ३० ते ३५ किमी अंतरावरुन लाभार्थी घरकुलाच्या धनादेशासाठी पंचायत समिती कार्यालयात येत असतात. दिवसभर कार्यालयात खेटून राहून अखेर निराश होऊन आल्यापावली घर गाठण्याची पाळी सामान्य जनतेवर येत असते. संबंधित घरकुल लाभार्थ्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाची पंचायत समिती पदाकिधारी व अधिकाऱ्यांना दखल घेण्यासाठी वेळच मिळत नाही, असे चित्र फेरफटका मारल्यावर दिसून येत आहे. घरकुलाचे बील मंजूर करण्यासाठी आर्थिक बळाचे वजन मांडल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही. घरकुलाचे एकूण तीन बील निघतात काहींचे दर ठरवले असल्याचे बोलल्या जाते.संबंधित कर्मचाऱ्यांना चाट लागली असल्यामुळे ज्यांच्या फाईलवर वजन आहे अशा फाईल अग्रक्रमाने पुढे जात असल्याचे महालगाव येथील एका घरकुल लाभार्थ्यांने सांगितले. वरिष्ठांची त्यांचेवर कृपादृष्टी असल्याने त्या कर्मचाऱ्यांचे फावते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य घरकुल लाभार्थी मात्र आजारी पंचायत समिती कार्यालयात नाडवाल्या जात सल्याचे दिसत आहे. बांधकाम विभागात कर्मचाऱ्यांचा ताफा असतानासुद्धा लाभार्थ्यांची बोळवण होवून खिशाला कात्री लावण्याचा प्रकार खुलेआम घडत असल्याची चर्चा लाभार्थी करीत असतात. धनादेश हाती घेतानी मोबदल्याची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची पंचायत समिती कार्यालयात कमतरता नाही.