शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

डोळे बंद करून ओळखते आकडे व रंग

By admin | Updated: June 3, 2015 01:15 IST

आधुनिक युगात मानवनिर्मित तंत्रज्ञानाने सर्वांना थक्क करुन सोडले आहे. विविध संशोधनात्मक वृत्तीमुळे व्यक्तीलाच ‘सेंसर मेमरी’ची ओळख झाली आहे.

आठ वर्षीय पवित्राची कमाल : ‘सेंसर मेमरी’ने केली कला अवगतआमगाव : आधुनिक युगात मानवनिर्मित तंत्रज्ञानाने सर्वांना थक्क करुन सोडले आहे. विविध संशोधनात्मक वृत्तीमुळे व्यक्तीलाच ‘सेंसर मेमरी’ची ओळख झाली आहे. येथील पवित्रा या आठ वर्षीय पालिकेने याच मेमरीच्या माध्यमातून अवगत केलेल्या सेंसर मेमरीने पाहणाऱ्यांना थक्क करून सोडणारी कला अवगत केली आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून नोटांचे, आधार कार्डवरील नंबरसह विविध वस्तू ओळखण्याची कला तिने अवगत केली आहे. आमगाव शहरातील मुख्य भागात राहणाऱ्या पवित्रा सुरेश उपाध्याय या आठ वर्षीय मुलीने सेंसर मेमोरीच्या माध्यमाने स्वत:ची इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण केली आहे. पवित्रा ही स्थानिक स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. कुटुंबात सामान्य राहणीमानात वावरणारी पवित्रा लहानपणापासून स्वत:तील गुणचातुर्यामुळे गुणवंत ठरत आहे. कोणत्याही वस्तुची ओळख नसताना इतरांना त्याबद्दल माहिती करुन देण्याची कला अवगत करुन घेतली आहे. त्यामुळे आधार कार्डवरील नंबर, अंकगणित, याचबरोबर विविध रंगांची ओळख ती डोळे झाकून करुन देते. विशेषत: ती नंबरांची अथवा कागदाची ओळख केवळ त्याचा गंध घेऊन सांगते. एखाद्या कागदावरील आकडा अवगत करताना ती कानाजवळ त्या वस्तुंचा आवाज करुन सहजपणे त्या कागदावरील आकडा ओळखते. तिचे हे अद्भूत चातुर्य थक्क करून सोडते. ड्रॉर्इंग बुकमधील रेखाचित्रावर ती न पाहता रंग भरुन ते चित्र सुुशोभित करुन दाखविते. भविष्यात सेंसर मेमरीच्या सहाय्याने ती सायकलिंग करण्याचे धाडस करणार, असा मानस तिने व्यक्त केला आहे. नृत्य, संगीत व पोहण्याची आवड असणाऱ्या पवित्राने भविष्यात सिनेमात काम करण्याची इच्छा दर्शविली आहे. सध्या तिची ही कला शहरात कौतुकाचा विषय झाली आहे. आपल्याला अवगत झालेली ही कला म्हणजे देवाची देणगी आहे असेही ती सांगते. ही कला म्हणजे कोणतीही जादू नाही तर ते सरावाने अवगत केलेले तंत्रज्ञान आहे. (शहर प्रतिनिधी)