शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘फाईव्ह स्टार’ मध्ये जिल्ह्यातील १५ शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:28 IST

नरेश रहिले।आॅनलाईन लोकमतगोंदिया : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियांनांर्गत शौचालय तयार करण्यात अग्रेससर राहणाऱ्या जिल्ह्यातील १५ शाळांची फाईव्ह स्टार ग्रेड मध्ये निवड करण्यात आली आहे. शाळांच्या स्थितीवरून उत्कृष्ट शाळांना राज्याकडून ग्रेड दिली जाणार आहे.केंद्र सरकारच्या स्वच्छ-सुंदर (स्मार्ट शहर) सोबत स्वच्छ सुंदर व मूलभूत सुविधा असलेल्या शाळा उभारण्याचा शासनाचा मानस आहे. या ...

ठळक मुद्दे१७५ थ्री स्टार शाळा : स्वच्छ भारत अभियानातंर्गत निवड

नरेश रहिले।आॅनलाईन लोकमतगोंदिया : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियांनांर्गत शौचालय तयार करण्यात अग्रेससर राहणाऱ्या जिल्ह्यातील १५ शाळांची फाईव्ह स्टार ग्रेड मध्ये निवड करण्यात आली आहे. शाळांच्या स्थितीवरून उत्कृष्ट शाळांना राज्याकडून ग्रेड दिली जाणार आहे.केंद्र सरकारच्या स्वच्छ-सुंदर (स्मार्ट शहर) सोबत स्वच्छ सुंदर व मूलभूत सुविधा असलेल्या शाळा उभारण्याचा शासनाचा मानस आहे. या योजनेंतर्गत स्वच्छ शाळा पुरस्कार योजना सरकारकडून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सन २०१७-१८ साठी स्वच्छ शाळा पुरस्कारासाठी २६८ शाळांनी प्रस्ताव सादर केले होते. यातील १५ शाळांची ‘फाईव्ह स्टार’ म्हणून निवड करण्यात आली आहे. तर ७२ शाळा फोर स्टारमध्ये आणि १७६ शाळांची थ्री स्टार म्हणून निवड करण्यात आली.निवड झालेल्या या शाळांचे मुल्यांकन जिल्हास्तरीय चमूद्वारे ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. ज्या शाळांची ‘फाईव्ह स्टार’साठी निवड करण्यात आली. त्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २, देवरी ३, गोंदिया २, सालेकसा २ तर तिरोडा तालुक्यातील ६ शाळांचा समावेश आहे. सडक -अर्जुनी, आमगाव व गोरेगाव तालुक्यातील एकाही शाळेचा समावेश नाही.निवड केलेल्या शाळांनी १०० पैकी ५० टक्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहे. जि.प.शिक्षण विभागानुसार स्वच्छ शाळा पुरस्कारासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. मुल्यांकनही आॅनलाईन होणार आहे. जिल्ह्यातील ४८ शाळांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.आॅनलाईन होणार मुल्यांकनशाळांना फाईव्ह स्टार, फोर स्टार व थ्री स्टार ग्रेड त्यांच्या स्थितीनुसार दिला जाणार आहे. फाईव्ह स्टार शाळोत भरपूर पाणी, स्वच्छता, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वच्छतेसाठी हँडवॉश स्टेशन ज्यात नेहमी पाणी उपलब्ध असेल, लिक्वीड, साबन उपलब्ध असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कचरापेटी, कचरा निर्मूलनाची व्यवस्था, स्वच्छतेची सुविधा ठेवण्याची जबाबदारी सर्वांची राहील.या शाळा ‘फाईव्ह स्टार’अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कनेरी येथील डॉ. आर. के. हायस्कूल, दाभनाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवरी रेहली येथील जिल्हा परिषद शाळा, म्हैसुली ची सोनियाबाई डी. आश्रम स्कूल, गोंदियाच्या नागरा येथील अनुसृचित जमाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी स्कूल, कटंगीकला येथील अ‍ॅक्यूट पब्लिक स्कूल, सालेकसा तालुक्यातील जमाकुडो येथील शासकीय सेकंडरी आश्रम शाळा, भजेपार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, तिरोडा येथील एससी एण्ड नवबौद्ध गर्ल्स स्कूल, गुमाधावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेरिटोरियस पब्लिक स्कूल, खैरलांजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनेगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा व परसवाडा येथील जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे.