शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या दिवशी सुरू झाली प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

डॉक्टरांच्या अभावामुळे मागील चार दिवसांपासून गंगाबाई स्त्री रूग्णालयात प्रसूती बंद होत्या. यावर ‘लोकमत’ने कडाडून टिका केली होती. याची दखल घेत सोमवारी (दि.३) पालकमंत्री डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे व आमदार विनोद अग्रवाल यांनी गंगाबाईतील डॉक्टरांचा तिढा सोडविला.

ठळक मुद्देगर्भवतींना मिळाला दिलासा : गंगाबाई रूग्णालयातील कामकाज रूळावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय हे गर्भवतींसाठी वरदान ठरण्यापेक्षा आता अभिशाप ठरण्याच्या मार्गावर होते. १ नोव्हेंबर पासून येथे गर्भवती महिलांची प्रसूती करण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे चार दिवसांपासून प्रसूती बंद होती. परंतु आमदार, खासदार व पालकमंत्री यांनी डॉक्टरांच्या कानपिचक्या घेतल्यानंतर पाचव्या दिवशी मंगळवारपासून (दि.५) प्रसूतीसाठी रूग्ण दाखल करुन प्रसूती सुरू करण्यात आली.डॉक्टरांच्या अभावामुळे मागील चार दिवसांपासून गंगाबाई स्त्री रूग्णालयात प्रसूती बंद होत्या. यावर ‘लोकमत’ने कडाडून टिका केली होती. याची दखल घेत सोमवारी (दि.३) पालकमंत्री डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे व आमदार विनोद अग्रवाल यांनी गंगाबाईतील डॉक्टरांचा तिढा सोडविला.गंगाबाईतील विदारकतेचे जिवंत चित्रण समाजासमोर मांडल्याने खळबळून जागे झालेले लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फक्त गंगाबाईवरच बोलू लागले. वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. पी.व्ही. रूखमोडेसह गंगाबाईत सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टरांना समस्या कशा सोडविता येईल यावर बोलून तेथील समस्या निवारणासाठी प्रथमच प्राधान्य देण्यात आले.पालकमंत्री डॉ. फुके, खासदार मेंढे, आमदार अग्रवाल व जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत समस्यांवर कसा तोडगा काढता येईल यावर चर्चा केली.गंगाबाईतील समस्या निवारणासाठी जिल्हा नियोजन निधीतून तीन कोटी रूपये देण्याची तयारी पालकमंत्री डॉ. फुके यांनी दर्शविली. पालकमंत्र्यांनी फटकारल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रु खमोडे यांनी सोमवारी (दि.४) प्रसूती सेवा बहाल करण्यासाठी सहा डॉक्टरांची पर्यायी व्यवस्था म्हणून डॉ. सायास केंद्रे, डॉ. आशा अग्रवाल, डॉ. शीतल खंडेलवाल, डॉ. राजश्री पाटील, डॉ. गरिमा अरोरा, व डॉ. सविता वडेरा यांना पाठविले. हे सर्व डॉक्टर आठ-आठ तासांची नोकरी करणार असे सांगण्यात आले. त्यानुसार, मंगळवारी (दि.५) प्रसूती सुरू करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी आता सुटकेचा श्वास घेतला. एकट्या गंगबाईवर जिल्ह्यातील गरीब जनता अवलंबून आहे, हे विशेष.मेडीकल फक्त नावाचेचगोंदियाचे वैद्यकीय महाविद्यालय फक्त नावासाठी आहे. मेडीकल कॉलेजमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा सोडा केटीएस रूग्णालयाच्या काळात मिळणाऱ्या साधारण सेवाही आता मिळत नाही. मेडीकल कॉलेजची परवानगी एमसीआयकडून टिकून राहावी यासाठी चमू येते. त्यावेळी बाहेरचे डॉक्टर बोलावून संख्याबळ दाखविले जाते. त्यानंतर मात्र चमू गेली की स्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल