शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

टॅÑक ओलांडण्याचा जीवघेणा पराक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:48 IST

फलाट ओलांडण्यासाठी किंवा गाडी पकडण्याच्या नादात ट्रॅक ओलांडण्याचा जीवघेणा पराक्रम प्रवाशांकडून केला जात आहे. येथील रेल्वे स्थानकावरील हा रोजचाच प्रकार झाला आहे.

ठळक मुद्देरेल्वे स्थानकावरील प्रकार : प्रवासी टाळतात रॅम्पचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : फलाट ओलांडण्यासाठी किंवा गाडी पकडण्याच्या नादात ट्रॅक ओलांडण्याचा जीवघेणा पराक्रम प्रवाशांकडून केला जात आहे. येथील रेल्वे स्थानकावरील हा रोजचाच प्रकार झाला आहे. यातच कित्येकांचा जीव गेला असला तरिही स्थानिक रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. मात्र या प्रकारावर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.गोंदिया रेल्वे स्थानकातून नागपूर, रायपूर, बालाघाट व चंद्रपूर या चारही दिशांनी रेल्वेगाड्या धावतात. त्यातच इतर प्रवाशांसह विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी अपडाऊन करतात. नागपूर, कामठी, भंडारा, तुमसर व तिरोडा इत्यादी स्थानकांतून प्रवासी मोठ्या संख्येने गोंदियाला येतात. सकाळी इंटरसिटी एक्स्प्रेस, इतवारी-रायपूर लोकल व विदर्भ एक्स्प्रेसने मोठ्या संख्येत प्रवासी गोंदिया स्थानकावर येतात. मात्र यापैकी अनेक प्रवासी रॅम्प किंवा पायदळ पुलाचा वापर न करता सरळ ट्रॅक ओलांडून दुसºया फलाटावर पोहोचतात व स्थानकाबाहेर पडतात. यावेळी त्यांना आळा घालण्यासाठी तेथे रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे पोलिस हजर नसतात.शॉर्टकटच्या नादात हा प्रकार प्रवाशांच्या जिवावर बेतणारा ठरू शकतो. मात्र प्रतिबंधासाठी रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना अद्याप करण्यात आली नाही. केवळ रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांचे ज्या दिवशी गोंदिया स्थानकात आगमन होते त्याच दिवशी पोलिसांचा बंदोबस्त व तिकीट निरीक्षकांची व्यवस्था केली जाते. मात्र या प्रकारातून अपघातांची शक्यता बळावली असून कारवाईची गरज आहे.