शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

३४ गुणवंत विद्यार्थ्यांसह २० सहयोगी शिक्षकांचा सत्कार

By admin | Updated: September 14, 2016 00:27 IST

व्ही.पी. इन्स्टिट्युट व पब्लिकेशन साताराद्वारे सन २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय इंडियन टॅलेंट सर्च (आयटीएस) परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करणारे

मान्यवरांचे मार्गदर्शन : इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यार्थ्यांचे सुयशेगोंदिया : व्ही.पी. इन्स्टिट्युट व पब्लिकेशन साताराद्वारे सन २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय इंडियन टॅलेंट सर्च (आयटीएस) परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करणारे ३४ विद्यार्थी व २० सहयोगी शिक्षकांचा सत्कार शनिवारी निर्मल हायस्कूल रेलटोली येथे करण्यात आला.अध्यक्षस्थानी आयटीएसचे विदर्भ प्रमुख संजय कुथे होते. अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते, संचालक फादर डायनियल, आयटीएसचे जिल्हा प्रमुख एल.एस. तागडे, गोरेगाव तालुका प्रमुख पटले, गोंदिया तालुका प्रमुख चंद्रशेखर चव्हाण उपस्थित होते. शहरी व ग्रामीण भागातील परीक्षेला बसलेल्या ४५० विद्यार्थ्यांपैकी गुणवत्ता प्राप्त ३४ विद्यार्थी व २० सहयोगी शिक्षकांचा सत्कार पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्राफी देवून करण्यात आले. सदर परीक्षेत तिन्ही समुहात सुदामा हायस्कूल आसोली येथील वर्ग आठवीचा विद्यार्थी अमन निलचंद बिसेन याने प्रथम क्रमांक मिळविला.इतर विद्यार्थ्यांमध्ये पल्लवी डोंगरे, साक्षी चव्हाण, रेखा सोनवाने, वैष्णवी निमकर, सितारा सोनवाने, पायल जतपेले, नेहा भेंडारकर, नेहा लांजेवार, चाहत बघेले, जयकिशोर कुर्वे, आकांशा हनवते, मीता फुले, पुनम बोरकर, नूतन हटवार, भूमेश गौतम, आतिशा आंबेडारे, मनिष येल्ले, प्रिया नागोशे, लीना पटले, दीक्षा रहांगडाले, विपूल पुसाम, शीतल कोडवते, रिशी पानोरे, भावना भेलावे, नेहा ठाकरे, सुप्रिया भेलावे, खुशबू रंगारी, शीतल हट्टेवार, लीना मडावी, कुणाल मोटघरे, अंजली कागदीउके, नंदिनी वालदे, दिव्यानी बन्सोड यांचा समावेश आहे.याप्रसंगी मान्यवरांनी स्पर्धा परीक्षांबद्दल आपले अनुभव व स्पर्धा परीक्षांमध्ये विदर्भ का मागासलेला आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. संजय कुथे यांनी आयटीएस संस्थेची उद्दिष्टे व कार्यपद्धती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांचे भविष्यातील शिक्षण व त्यांचे करियर यावरही मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक चंद्रशेखर चव्हाण यांनी मांडले. संचालन स्वाती बोहरे यांनी केले. आभार वाय.एस. तागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी देसाई, सर्व शिक्षक व निर्मल हायस्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)