शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारपासून आमरण उपोषण

By admin | Updated: February 15, 2016 01:53 IST

नवेगावबांध येथील मुस्लीम समाजाला मुर्दे गाडण्यासाठी मुकर्रर असलेल्या जागेवर एका महिलेने झोपडी बांधून अतिक्रमण केले.

इशारा : मुस्लीम कब्रस्तान कमिटी नवेगावबांधअर्जुनी मोरगाव : नवेगावबांध येथील मुस्लीम समाजाला मुर्दे गाडण्यासाठी मुकर्रर असलेल्या जागेवर एका महिलेने झोपडी बांधून अतिक्रमण केले. ते तातडीने हटविण्यात यावे यासाठी मुस्लीम कब्रस्तान कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून (दि.१६) बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, नवेगावबांध येथील गट क्र. ११०७ मधील १.२७ हे.आर. जागा ही अनेक वर्षांपासून मुस्लीम समाजाला मुर्दे गाडण्याकरिता मुकर्रर आहे. १५ आॅगस्ट २०१४ रोजी कुंपन व जळाऊ काड्या ठेवून एका महिलेने येथे अतिक्रमण केले. ही जागा भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करण्यात आली. एवढेच नव्हे तर ११ जानेवारी रोजी झोपडी सुद्धा बांधली. तक्रार करताच चौकशी झाली मात्र अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. यासंदर्भात अनेकदा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आल्या. मात्र सातत्याने कानाडोळा केला जात आहे.या वादग्रस्त जागेच्या संबंधाने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी २६ मे २०१५ रोजी एक आदेश पारित केला. प्रकरणात शासकीय जागेवर अतिक्रमण असल्यास फौजदारी प्रक्रिया संविधा १९७३ कलम १४५ प्रमाणे ताबा अंतिम करण्यात येत नाही. तहसीलदारांनी १५ दिवसात या शासकीय जागेवर योग्य निर्णय घेवून आदेश पारित करावे, असा निर्णय दिला. मात्र अद्यापही तहसीलदारांनी यावर कुठलाच निर्णय दिला नाही. या जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवून सातबाराचा उतारा मुस्लीम कब्रस्तानच्या नावाने नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)