शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या कलागुणांचे दर्शन घडविणारा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 21:56 IST

पहिल्यांदाच एका वॉर्डतील महिला, पुरूष, युवक व युवतींनी एकत्रीत होवून कुंभारेनगर महोत्सव आयोजित करून गोंदियाकरांना नवा संदेश दिला आहे. ज्या महिला आधी चूल आणि मूल यापुरत्याच मर्यादित राहत होत्या त्या आता महोत्सवाचे आयोजन करीत आहेत. कुंभारेनगर महोत्सव या वॉर्डातील महिलांच्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडविणारा असल्याचे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी केले.

ठळक मुद्देवर्षा पटेल : कुंभारेनगर महोत्सवाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: पहिल्यांदाच एका वॉर्डतील महिला, पुरूष, युवक व युवतींनी एकत्रीत होवून कुंभारेनगर महोत्सव आयोजित करून गोंदियाकरांना नवा संदेश दिला आहे. ज्या महिला आधी चूल आणि मूल यापुरत्याच मर्यादित राहत होत्या त्या आता महोत्सवाचे आयोजन करीत आहेत. कुंभारेनगर महोत्सव या वॉर्डातील महिलांच्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडविणारा असल्याचे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी केले.प्रज्ञाशिल बहुुउद्देशिय सामाजिक संस्था व नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंचच्यावतीने आयोजित कुंभारेनगर महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगरसेवक पंकज यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे जिल्हाध्यक्ष धु्रवास भोयर, सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, नगरसेवक संकल्प खोब्रागडे, साहित्यीक यशवंत तागडे व अन्य उपस्थित होते. पूढे बोलताना पटेल यांनी, कुंभारेनगर महोत्सव हा नवनिर्मिती व परंपरेचा सुरेख संगम व नवा आविष्कार आहे. हा केवळ श्रवणानंद देणारा सोहळा नव्हे तर आत्मिक आनंद देणारी मेजवानी होय. ही कुंभारेनगर महोत्सवाची परंपरा नेहमीच सुरू राहीली पाहिजे. या महोत्सवासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. कारण या महोत्सवातून महिलांच्या अंगातील सुप्त गुण समोर आल्याचे पाहायला मिळाले असे मत व्यक्त केले.तसेच, सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिला. तेव्हा आमच्या या महामानवांच्या विचारांना घेवून समोर जायचे असून महिलांनी समोर येवून नवक्र ांती करून देशातील समाजविघातक प्रवृत्तींना बाहेर फेकायचे आहे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक मांडून संचालन उदय चक्र धर यांनी केले. आभार तुषार मेश्राम यांनी मानले.कार्यक्र मासाठी विनय सांगोडे, प्रणय दरवडे, अनिवेश तागडे, उत्तमा गोंडाणे, निर्मला मेश्राम, वैशाली चंद्रिकापूरे, सुप्रिया नागदेवे, सयोगीता मेश्राम, सपना मेश्राम, रंजिता इंदूरकर, शोभा वैद्य, लता पाटील, रितू राहुलकर, चंद्रलेखा गजभिये, आकाश बन्सोड, नवनीत भाष्कर, विशेष डोंगरे, प्रेमरतन गडपायले, दुर्गेश येल्ले, प्रमोद भोयर यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे निमित्त साधून वृक्षारोपणकुंभारेनगर महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्र म घेण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्र माचे उद्घाटन नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांनी केले. याप्रसंगी तिर्थराज नागदेवे,यशवंत तागडे,पतीराम मेश्राम,श्रीराम कुथेकर, कृष्णाजी सांगोडे,अशोक मेश्राम,विजय मेश्राम, मनोहर दरवडे हे उपस्थित होते.