शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जंगलालगतच्या शेतांना जाळीचे कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

या योजनेतंर्गत मागील दोन वर्षांपासून काम सुरू आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील शेकडो गावात लोखंडी जाळी लावण्याचे काम करण्यात आले आहे. या योजनेशिवाय सेंट्रल इंडिया टायगर कंजरवेशन प्रकल्पातंर्गत स्वंयसेवी संस्था सुध्दा जंगलाच्या सीमेलगत असलेल्या गावांच्या सीमेवर लोखंडी जाळी लावण्याचे काम करीत आहे.

ठळक मुद्दे५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद : ७० गावात लावली जाळी, स्वंयसेवी संस्थाचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहे. तर दुसरीकडे जंगलालगत असलेल्या गावांमध्ये मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष वाढत आहे.जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे हे नुकसान टाळून मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी जंगल आणि शेतालगत जाळीचे कुंपन तयार करण्याचे काम सुरू केले आहे. जिल्ह्यातील ७० गावात काम पूर्ण झाले असून पुन्हा काही गावांची निवड करण्यात आली आहे.डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत प्रायोगिक तत्त्वावर जंगला लगत असलेल्या संवेदनशिल गावांच्या सीमेवर लोखंडी जाळी लावण्यासाठी शासनाने २८ ऑगस्टला २०१९ ला ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या योजनेतंर्गत मागील दोन वर्षांपासून काम सुरू आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील शेकडो गावात लोखंडी जाळी लावण्याचे काम करण्यात आले आहे. या योजनेशिवाय सेंट्रल इंडिया टायगर कंजरवेशन प्रकल्पातंर्गत स्वंयसेवी संस्था सुध्दा जंगलाच्या सीमेलगत असलेल्या गावांच्या सीमेवर लोखंडी जाळी लावण्याचे काम करीत आहे. वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडिया या स्वंयसेवी संस्थेने आत्तापर्यंत जिल्ह्यातील ६८ गावात लोखंडी जाळी लावण्याचे काम पूर्ण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत झाली.यासंदर्भात वन्यजीव विभागाचे अधिकारी एस.डब्ल्यू.सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या ग्रामपंचायतीकडून लोखंडी जाळी लावण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन पाठविले जातात त्याच गावांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लोखंडी जाळी उपलब्ध करुन दिली जाते. सध्या यासंदर्भात गावांकडून प्रस्ताव मागविले जात असल्याचे सांगितले.मुरपारटोली,लेंडेझरी येथील शेतकºयांनी केले श्रमदानसडक अर्जुनी तालुक्यातील मुरपारटोली आणि लेंडेझरी येथील शेतकरी ऊसाची लागवड करतात.मात्र वन्यप्राण्यांकडून ऊसाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ते त्रस्त झाले होते. वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाचे व्यवस्थापक अनिल कुमार यांनी वन्यप्राण्यामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी जाळी लावण्याचा प्रस्ताव ठेवला.त्यानंतर शेतकरी यासाठी तयार झाले. मुरपारटोली येथे २९.१७ हेक्टर आणि लेंडेझरी येथे ७१ हेक्टरवर लोखंडी जाळी लावण्यात आली.मुरपारटोली येथील २१ आणि लेंडेझरी येथील २७ शेतकºयांनी १५ टक्के प्रमाणे खर्च केला.तर वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाने या दोन्ही गावांसाठी ८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च केला. जाळी लावण्यासाठी खड्डे तयार करण्याचे काम शेतकºयांनी श्रमदान करुन केले.अधिक क्षमतेची बॅटरी लावाडॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत जंगलाच्या सीमेलगत असलेल्या भागात पिकांचे संरक्षण करण्यासाठी लोखंडी जाळी लावून दिली जात आहे. यास अधिक क्षमतेची बॅटरी सुध्दा लावून दिली जात आहे. मात्र ती कमी क्षमतेची असल्याचे बोलल्या जाते.वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाकडून अधिक क्षमतेच्या बॅटºया लावून देण्यात आल्या आहे. यासाठी प्रती शेतकरी १६ ते १७ हजार रुपयांचा खर्च येतो. लोखंडी जाळीमध्ये सौम्य स्वरुपाचा विद्युत प्रवाह राहत असल्याने वन्यप्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यास मदत होते.

टॅग्स :agricultureशेती