शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सागवान तस्करांवर वन्यप्राण्यांच्या शिकारीचेही गुन्हे

By admin | Updated: October 26, 2016 02:29 IST

जिल्ह्याच्या संरक्षित वनक्षेत्रात सागवान वृक्षांची तस्करी करताना वनविभागाच्या हाती लागलेले पाचही आरोपी

पाचही आरोपी सराईत : गोंदिया वनपरिक्षेत्र विभागाची यशस्वी कारवाईगोंदिया : जिल्ह्याच्या संरक्षित वनक्षेत्रात सागवान वृक्षांची तस्करी करताना वनविभागाच्या हाती लागलेले पाचही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वन्य प्राण्यांची शिकार केल्याचे अनेक गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. आता सागवान तस्करीतही ते अडकल्यामुळे सागवान तस्करीत अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांपर्यंत त्यांच्यामार्फत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.गोंदिया वन परिक्षेत्राच्या चमूचे नेतृत्व करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात दि.२३ व २४ आॅक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत राजेश श्यामराव मरस्कोल्हे (३५), निरंजन सदाशिव कुंभरे (३५), रवी कांतिलाल धुर्वे (३६), बाबुलाल सुखदेव भदाडे (३८) व नरेंद्र सुखराम सोनटक्के (३२) सर्व रा. धामनेवाडा यांना अटक करून त्यांच्यावर वनगुन्हा (जी/६२/१९, दि.२२/१०/२०१६) नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपींनी संरक्षित वनक्षेत्र (कक्ष क्र.४७) जुनेवानी बीट व (कक्ष क्रमांक ३६७) निमगाव (इंदोरा) बीटमध्ये सागवान वृक्षांची अवैध कटाई केली होती. या घटनेची माहिती गोंदिया वनक्षेत्र कार्यालयात मिळताच चमुने तत्काळ कारवाई करून सागाचे कापलेले वृक्ष व साहित्य जंगलातून जप्त केले. तसेच घटनास्थळावरून राजेश मरस्कोल्हे, निरंजन कुंभरे व रवी धुर्वे या तीन आरोपींना अटक केली. मात्र चौथा आरोपी बाबुलाल भदाडे पळून जाण्यात यशस्वी ठरला. ही कारवाई २३ आॅक्टोबरला करण्यात आली. सदर तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना २५ आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली होती. वनकोठडी संपल्यानंतर मंगळवारी त्यांची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली.वनविभागाच्या चमुने दि.२४ रोजी चौथा फरार आरोपी बाबुलाल भदाडे व नरेंद्र सोनटक्के या दोघांना अटक केली. सोनटक्के याने सदर चारही आरोपींकडून सागवानची लाकडे विकत घेवून अवैध वृक्षतोडीस चालना देवून मदत केल्याने त्यालाही अटक झाली. सर्व पाचही आरोपींना २५ आॅक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्यावर वन अधिनियम १९२७ च्या कलम ३२ (अ), ३३ (१) (अ) (एफ) (एच) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने पाचही आरोपींची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली. (प्रतिनिधी)- बिबट-चितळाचीही केली शिकारजुनेवानी व निमगाव वनक्षेत्र हे बफर झोनमध्ये समाविष्ट असून तेथे वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. या परिक्षेत्रात अटक झालेले चारही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वन्यप्राण्यांच्या हत्येचे गुन्हेसुद्धा आहेत. आरोपी राजेश मरस्कोल्हे व निरंजन कुंभरे यांच्यावर ९ फेब्रुवारी २०१६ रोजी निलगाय शिकार केल्याचा गुन्हा नोंद आहे, तर रवी धुर्वे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वन्यप्राणी शिकारीचे सहा गुन्हे नोंद आहेत. धुर्वे याच्यावर २ डिसेंबर २०१२, तसेच १६ आॅगस्ट २०११ व २९ जानेवारी १९९५ या तारखांना बिबट शिकारीचे गुन्हे दाखल आहेत. तर १६ एप्रिल २०११ रोजी चितळ शिकारीचा गुन्हा, १६ एप्रिल २०१६ रोजी विद्युत करंट लावणे व २ डिसेंबर २०१४ रोजी बिबट शिकारीचा गुन्हा दाखल आहे. चौथा गुन्हेगार बाबुलाल भदाडे याच्यावर २ डिसेंबर २०१४ रोजी बिबट शिकार व २३ फेब्रुवारी २००९ रोजी अवैध कोळसा वाहतुकीचा गुन्हा नोंद आहे.