शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार

By admin | Updated: August 19, 2016 01:29 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात विविध क्षेत्रात

गोंदिया : स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच सरपंच व सचिवांचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच व सचिव यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आमगाव तालुक्यातील गोसाईटोला येथील सरपंच प्रभाबाई शिवबंशी, सचिव डी.के.महाकाळकर, सालेकसा तालुक्यातील रोंधा ग्रामपंचायत सरपंच मिलावतीबाई लिल्हारे, सचिव एन.जी.राठोड, बिंझलीच्या सरपंच सुलोचना लिल्हारे, सचिव जी.सी.भुमके, अर्जुनी/मोर. तालुक्यातील तुकमनारायण, ग्रामपंचायतचे सरपंच दयाराम शहारे, सचिव एस.एस.मेंढे, सोमलपुरचे सरपंच आशा हातझाडे, सचिव वाय.सी.डोंगरे, तिरोडा तालुक्यातील सालेबर्डीचे सरपंच विनोद लिल्हारे, सचिव गणेश कापगते, मनोरा ग्रामपंचायतच्या सरपंच लताबाई पेशने, सचिव एस.डी.उईके यांचा तर क्र ीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्ह्यातील युवकांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून जिल्हास्तरीय युवा पुरस्कार ब्रम्हानंद सांस्कृतिक अकादमी गोंदिया, कपील बिसेन, सीमा रहांगडाले यांना गौरविण्यात आले. ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेअंतर्गत आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील हर्षा भेदे, गोरेगाव तालुक्यातील हिरापूर येथील स्वरांगी नेवाने यांना प्रशस्तीपत्र, आरोग्य विभागात सन २०१५-१६ या वर्षात उत्कृष्ट कामिगरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यामध्ये सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.सी.वानखेडे यांनी सर्वाधिक कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याबद्दल, प्राथमिक आरोग्य केंद्र खमारीच्या आरोग्य सेविका कुसूम लांजेवार, कुंदा गजभिये, आशा कार्यकर्ती म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावच्या रेखा पटले. गोंदिया भारत स्काऊट आणि गाईडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुवर्णा बाण चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुरु कृपा आदिवासी आश्रम शाळा ठाणा येथील कब मुले शिवांक उईक, अविनाश मडावी, हिरालाल वरखडे, गुरु नानक वरिष्ठ प्राथमिक शाळा गोंदियाच्या बुलबुल मुली अश्वीनी नंदागवळी, सांची रंगारी, राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार जीईएस हायस्कूल दासगावचे भगीरथ जिवानी, गुरु नानक वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मंजुषा देशपांडे, सामाजिक वनीकरण विभागामार्फत राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत निवड केलेल्या २ कोटी वृक्ष लागवड आण ित्याचे होणारे चांगले परिणाम या विषयावरील निबंध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या प्राथमिक गटातील जानवी वैद्य- प्रथम, करिश्मा कारडा- द्वितीय, हर्षल डोंगरे- तृतीय. माध्यमिक गटातील गीतांजली पोहरे- प्रथम, हेमाश्री तुरकर- द्वितीय, कुशल बिसेन- तृतीय यांचा प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच चोरट्याला पकडून देणाऱ्या महिला पोलीस गुनेश्वरी भांडारकर सोनवाने यांना रोख ५ हजार रुपये बक्षीस देवून पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)