शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

By admin | Updated: July 23, 2015 01:49 IST

तालुक्यातील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांनी आपल्या विभागातील समस्यांची जाण ठेवून त्या दूर करून समाजहितासाठी शर्तीचे प्रयत्न करावे.

बोंडगावदेवी : तालुक्यातील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांनी आपल्या विभागातील समस्यांची जाण ठेवून त्या दूर करून समाजहितासाठी शर्तीचे प्रयत्न करावे. विरोधांची भूमिका न अंगिकारता सभागृहात एकीचे प्रदर्शन करून तालुक्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या समन्वयातूनच विकास कामाला गती प्राप्त होईल. मावळल्या सदस्यांच्या अनुभव कथनाने आजी सदस्यांच्या ज्ञानात भर पडून विधायक कार्याला बळ प्राप्त होईल, असा आशावाद नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी व्यक्त केला. पंचायत समितीच्या सभागृहात सभापती अरविंद शिवणकर यांच्या एका आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून परिचय मेळावा व सत्कार समारंभ पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.पंचायत समितीचे मावळते सदस्य व विद्यमान सदस्यांच्या सत्कार व परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित पं.स. सभापती अरविंद शिवणकर होते. या वेळी दर्शनीस्थळी नवनिर्वाचित उपसभापती आशा झिलपे, मावळते सभापती तानेश ताराम, मावळते उपसभापती अ‍ॅड. पोमेश्वर रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. पं.स. सभापती अरविंद शिवणकर म्हणाले की, ज्या विश्वासाने जनतेने आपल्याला निवडून दिले त्यांचा विश्वासघात होणार नाही, याची दक्षता घेणे सदस्यांना क्रमप्राप्त आहे. शासनाच्या विविध योजना आपल्या गावात कशा कार्यान्वित होतील यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक पं.स. सदस्याने जागरूक राहणे गरजेचे आहे. विविध विभागात बऱ्याच जागा रिक्त आहेत. त्या जागा त्वरित भरण्यासाठी पाठपुरावा करून शर्तीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यानंतर मावळते सभापती तानेश ताराम, माजी उपसभापती पोमेश रामटेके, माजी पं.स. सदस्य किशोर तरोणे, दिनदयाल डोंगरवार, माणिक घनाडे, प्रमोद पाऊलझगडे, महादेव बोरकर, जागेश्वर भोगारे, अल्का बांबोळे, रत्नमाला राऊत तसेच विद्यमान पं.स. सदस्य नाना मेश्राम, जनार्दन काळसर्पे, होमराज कोरेड्डी, प्रेमलाल गेडाम, शिशुकला हलमारे, करूना नांदगावे, नाजुका कुंभरे, पिंगला ब्राम्हणकर, जयश्री पंधरे, सुधीर साधवानी, रामलाल मुंगनकर, अर्चना राऊत, उपसभापती आशा झिलपे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रभारी खंड विकास अधिकारी डॉ. नरेश कापगते, अभियंता एस.बी. चव्हाण, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)