बोंडगावदेवी : गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकाारी उल्हास नरड यांची भारत सरकारतर्फे आदर्श शिक्षणाधिकारी पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नरड यांनी विविध उपक्रम राबवून जिल्ह्यातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आमुलाग्र बदल घडविण्यात शिक्षणाधिकारी म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे. शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात त्यांची विलक्षण हातोटी आहे. येत्या ५ मार्चला त्यांना सरकारकडून सन्मानित केले जाणार आहे. गोंदियाच्या शिक्षण विभागाचा दिल्लीत झेंडा रोवल्याबद्दल नरड यांचा उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, विकास मोटघरे यांच्या उपस्थितीत एल.यू.खोब्रागडे, कैलाश हाडगे, विनोद बडोले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षणाधिकारी नरड यांनी बाक्टी येथील दोन अनाथ भावंडांना आर्थिक मदत देऊन सामाजिक भान सुध्दा जपले आहे.(वार्ताहर)
शिक्षक समितीकडून शिक्षणाधिकाऱ्यांचा सत्कार
By admin | Updated: February 27, 2017 00:18 IST