शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन शौर्य’साठी ‘सीईओं’चा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:42 IST

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून ‘मिशन शौर्य’ अंतर्गत १० विद्यार्थ्यांना माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रोत्साहित करणारे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी ....

ठळक मुद्देयुवतीसह पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी केला माऊंट एव्हरेस्ट सर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून ‘मिशन शौर्य’ अंतर्गत १० विद्यार्थ्यांना माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रोत्साहित करणारे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी यांचा शुक्रवारी (दि.८) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी जि.प. गोंदियाचे सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, शैलजा सोनवाने, विश्वजित डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. गावडे, माजी अध्यक्ष उषा मेंढे, माजी उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी सभापती पी.जी. कटरे, छाया दसरे, विमल नागपुरे, जि.प. चे ज्येष्ठ सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सुद्धा डॉ. राजा दयानिधी यांचे पुष्पगुच्छ देवून कौतुक केले. चंद्रपूर येथे आदिवासी विकास विभागात परिविक्षाधिन प्रकल्प अधिकारी म्हणून डॉ. राजा दयानिधी कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी ‘मिशन शौर्य’ हा उपक्रम राबविला. त्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत प्रशिक्षणासाठी ५० आदिवासी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. १० विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करण्यास सुरूवात केली. त्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात माऊंट एव्हरेस्ट सर केले.विशेष म्हणजे, यात एका आदिवासी विद्यार्थिनीचा देखील समावेश आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तथा महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा लौकीक वाढविण्यासाठी डॉ. राजा दयानिधी यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सत्कार केला. गोंदिया जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे कौतुक केले.