शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

भरकटणाऱ्या पावलांना ‘मैत्री’ने सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:23 AM

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अर्श कार्यक्रमांतर्गत सुरू ‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून संकुचित प्रवृत्तीच्या पौगंडावस्थेतील मुला-मुलींना मोकळपणे व्यक्त होण्यास शिकविले जात आहे. बालकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांना वेळेवर शास्त्रीय पद्धतीने समाधान होणे गरजेचे असते. दररोज अनके पाल्यांचे आई-वडील पाल्यांचा समस्या घेऊन जिल्हा रूग्णालयातील ‘मैत्री’ संवाद केंद्रात पोहचून ...

ठळक मुद्देनऊ महिन्यातील मार्गदर्शन : संवाद केंद्र ठरत आहे उपयोगी

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अर्श कार्यक्रमांतर्गत सुरू ‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून संकुचित प्रवृत्तीच्या पौगंडावस्थेतील मुला-मुलींना मोकळपणे व्यक्त होण्यास शिकविले जात आहे. बालकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांना वेळेवर शास्त्रीय पद्धतीने समाधान होणे गरजेचे असते. दररोज अनके पाल्यांचे आई-वडील पाल्यांचा समस्या घेऊन जिल्हा रूग्णालयातील ‘मैत्री’ संवाद केंद्रात पोहचून मार्गदर्शन घेत आहेत. ‘मैत्री’ संवाद केंद्रातून मागील नऊ महिन्यात ३ हजार ६२३ मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.शारीरिक बदल होतांना अनेक समस्या येतात. शिक्षक व पालक त्यांच्या विचीत्र वागण्याची तक्रार करीत असतात. परंतु त्या वागण्यात मुला-मुलीची चूक नाही. वाढत्या वयासह शरीरात बदल होत असतात. या बदलाला स्वीकारताना अनेक समस्या येतात. अशा मुला-मुलींना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ते बरेचदा ते चुकीच्या मार्गावर जात असतात. ‘मैत्री’ द्वारे १० ते १९ वर्षातील मुला-मुलींना मार्गदर्शन केले जाते. जिल्हा सामान्य रूग्णालयातील ‘मैत्री’संवाद केंद्रात दररोज सुरू असतो. याशिवाय बाई गंगाबाई महिला रूग्णालयात गुरुवार, तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात बुधवार व देवरीच्या ग्रामीण अस्पतालयात शुक्रवारला आठवड्यातून एक दिवस सेवा दिली जाते. ‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून मुला-मुलींच्या शारीरिक, मानसिक व लैंगिक आरोग्यासंदर्भात माहिती दिली जाते.मोफत हिमोग्लोबीन, रक्त व सिकलसेल तपासणी केली जाते. विवाह पूर्वी मार्गदर्शन, आहार विषयक मार्गदर्शन व रक्ताची कमतरता उपचार केला जात आहे.मासिक पाळीतील आजारासंबंधी माहिती दिली जाते. प्रजनन व लैंगिक आजारसंबधी प्रतिबंधक आरोग्य शिक्षण व उपाय योजना केली जाते. ही सर्व माहिती गुप्त ठेवली जाते. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या ‘मैत्री’ केंद्रात सन २०१७ मध्ये एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत ३ हजार ६२३ मुला-मुलींना मार्गदर्शन केले जाते. एकट्या डिसेंबर महिन्यात ४०० मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.मोबाईल ठरत आहेत घातकअँड्रॉईड मोबाईलचा सर्वाधिक परिणाम तरुण आणि अल्पवयीन मुलांवर होत आहे. किशोरवयीन मुले- मुली अँड्रॉईड मोबाईल, इंटरनेटचा सर्रास वापर करतात, टी. व्ही. चॅनलवर त्यांनी जे पाहू नये ते पाहतात. त्याचेच अनुकरण करुन अश्लील कृत्य करतात. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. शाळांमध्ये अनेक कृत्य झाल्याचे उदाहरणे पुढे आली आहेत. बालके प्रौढ व्यक्तीसारखा व्यवहार करतात. या स्थितीमुळेलैंगिक शोषणाच्या प्रकरणात वाढ झाली आहे. पौगंडावस्थेतील बालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘मैत्री’ संवाद केंद्राकडून आश्रमशाळा, झोपडपट्टी परिसर, शाळेत मार्गदर्शन केले जाते. बालकांच्या समस्यांना घेऊन काही पालक व शिक्षक ‘संवाद केंद्रात येतात. परंतु मोकळेपणाने बोलत नाहीत. अश्यावेळी बालकांशी एकट्यात संवाद साधला जातो. काही मुले-मुली आपल्या समस्या कागदावर लिहून देतात.आकर्षणाची दोन कारणेतज्ञांच्या मते, भिन्न लिंगी व्यक्तीसंदर्भात १५ ते १७ वर्ष वयोगटात आकर्षण तयार होते. त्याला ते प्रेमाचे नाव देतात. काही मुले-मुलींमध्ये भावनात्मक संबधाची तीव्र इच्छा व्यक्त केली जाते. हे आकर्षण दोन प्रकारचे आहेत. पहिले आकर्षण शारीरिक रूपात असते. त्यात पोषाख, सौंदर्य याचे महत्व असते. तर दुसºयात मानसिक विचार, सवलत, सामाजिक दृष्टिकोणाचे महत्व असते. परंतु आता हे आकर्षण होण्याचे वय कमी होताना दिसत आहे. यामुळे बालगुन्हेगारी वाढत आहे.