शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्ती देण्यासाठी उमेदवारांचे उपोषण

By admin | Updated: July 26, 2016 01:34 IST

राज्य शासनाच्या आदेशाने गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत विविध ठिकाणच्या आरोग्य केंद्रात रिक्त असलेली आरोग्य सेविकांची ३७ पदे भरण्यासाठी २५ नोव्हेंबर २०१५ ला परीक्षा घेण्यात आली.

नऊ महिन्यांपूर्वी घेतली परीक्षा : १०१३ उमेदवारांचा जीव टांगणीलागोंदिया : राज्य शासनाच्या आदेशाने गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत विविध ठिकाणच्या आरोग्य केंद्रात रिक्त असलेली आरोग्य सेविकांची ३७ पदे भरण्यासाठी २५ नोव्हेंबर २०१५ ला परीक्षा घेण्यात आली. मात्र नऊ महिने लोटले तरी ही या भरतीची पुढील प्रक्रिया केली जात नसल्यामुळे परीक्षा देणाऱ्या १०१३ उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यापैकी १० उमेदवार महिला सोमवारपासून जि.प. समोर बेमुदत उपोषणावर बसल्या आहेत.आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवेत गणल्या जात असल्याने या विभागाची सेवा जास्तीत जास्त चांगली राहावे यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. सदर आरोग्य सेविकांच्या पदभरतीला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात आव्हाण दिले होते. त्यानंतर न्यायालयाने राज्यभरात या पदभरतीला स्थगीती दिली होती. मात्र रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावित होऊ नये म्हणून काही जिल्ह्यांनी ही पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित निकालाच्या अधीन राहून उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. उमेदवारांनीही न्यायालयाचा निकाल मान्य राहील असे प्रतिज्ञापत्र लिहून दिले. िभंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या सर्वच जिल्ह्यात ही भरती प्रक्रिया पूर्ण करून आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र गोंदियातच ही प्रक्रिया केली नाही. त्यामुळे्न नियुक्तीच्या आशेने नजर लावून बसलेल्या हजारावर बेरोजगार युवती करीत आहेत.सरळ सेवा भरतीअंतर्गत २५ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या या परीक्षेचा निकाल ३० नोव्हेंबरलाच लावला होता. मात्र प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी न लावता सरसकट सर्वांचे गुण असणारी यादी लावण्यात आली. त्यामुळे नेमका कुणाचा नंबर लागू शकतो याचाही अंदाज घेणे शक्य होत नसल्यामुळे उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या चकरा मारीत थकलेल्या उमेदवारांनी आज सोमवारपासून जि.प. समोर उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणावर सपना मेश्राम, पुष्पा कटरे, मनिमाला विश्वास, अनिता सोनवाने, प्रतिमा रामटेके, लता कापसे, दीपमाला उंदीरवाडे, भूमाली उईके, अर्चना बोरकर, जयश्री केंद्रे, वर्षा गेडाम, गंगा चव्हाण, सुंदरा भगत, उषा मेंढे ह्या उमेदवार बसल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली भेटआरोग्य सेविका म्हणून नियुक्ती देण्यात यावी या मागणीला घेऊन जि.प. समोर उपोषण सुरू केलेल्या उमेदवारांच्या मंडपाला पहिल्याच दिवशी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी भेट दिली. फाईल जिल्हाधिकारी यांच्या दालनात आहे. २८ ताखेला त्यावर सभा होणार आहे. त्याच्यानंतरच त्यावर निर्णय होऊ शकेल असे त्यांनी त्या उपोषणकर्त्या उमेदवारांना सांगितले. यावेळी प्रहारचे प्रमोद गजभिये उपस्थित होते.