शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

मंडळांच्या थेट संपर्कात येणार एफडीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:15 IST

महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) नोंदणी करणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्देकार्यशाळेचे आयोजन : मंडळ व मिष्ठान्न व्यावसायिकांना करणार मार्गदर्शन

कपिल केकत। लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) नोंदणी करणे अनिवार्य आहे. पण माहितीअभावी मंडळांकडून नोंदणी केली जात नाही. यासाठी मंडळांत जनजागृती करून महाप्रसाद नोंदणीसाठी त्यांना आवाहन व प्रोत्साहित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने आता थेट मंडळांच्या संपर्कात येणार आहे. यासाठी शहरात कार्यशाळा आयोजित करुन मंडळ, मिष्ठान्न व्यवसायी व हॉटेल्सचालकांना मार्गदर्शन करणार आहे.गणपती व दुर्गा उत्सवाची जिल्ह्याची परंपरा काही वेगळी आहे. यातही गोंदिया शहरातील दुर्गा उत्सवाची सर्वत्र ख्याती आहे. लगतच्या छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील लोकांची पावलेही या दोन उत्सवांत आपसूकच गोंदियाकडे खेचली जातात. बाहेरून येणाºया भाविकांची सोय व्हावी, या हेतूने मंडळांकडून महाप्रसादाचे वितरण केले जाते. त्यातही दुर्गाउत्सवात तर प्रत्येक मंडळाकडून महाप्रसाद वितरीत केला जातो. महाप्रसाद वितरणातून पुण्य कमविण्याचे हे सत्कार्य होत असले तरीही महाप्रसादातून विषबाधा झाल्यासारखे प्रकारही ऐकीवात येतात. यामुळे महाप्रसाद वितरणासाठी मंडळांना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करून परवानगी घेणे बंधनकारक आहे. उत्सव साजरा करताना पोलीस विभाग व वीज वितरण कंपनीची परवानगी घेणे गरजेचे असतानाच महाप्रसादासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र विभागाकडून काहीच कारवाई होत नसल्याने मंडळांना याबाबत अद्याप माहिती नाही. यासाठी मात्र शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे पोलीस व वीज वितरण कंपनीची परवानगी जशी बंधनकारक आहे तशीच अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याबाबतची जनजागृती करवून देण्यासाठी विभाग थेट मंडळांच्या संपर्कात येणार आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत विभागाचे अधिकारी मंडळांसह मिष्ठान्न व्यवसायी व हॉटेल्सचालकांना मार्गदर्शन करणार आहेत.स्लाईड-शोमधून मार्गदर्शनअन्न व औषध प्रशासनाकडून येथील गणपती व दुर्गा उत्सव मंडळांसह मिष्ठान्न व्यवसायी व हॉटेल्सचालकांची एक कार्यशाळा आयोजीत केली जाणार आहे. या कार्यशाळेत विभागाचे अधिकारी त्यांना स्लाईड-शोच्या माध्यमातून मिठाई किंवा प्रसाद तयार करताना घ्यावयाची खबरदारी, स्वच्छता, वापरण्यात येणारा पदार्थ आदि महत्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन करणार आहे. आता दुर्गा उत्सवाच्या दृष्टीकोणातून याला जरी उशीर होत असला तरी पुढील वर्षासाठी मात्र हा प्रयोग उपयोगी ठरेल.मनुष्यबळाचा अभावअन्न व औषध विभागाचे येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र कार्यालयात मनुष्यबळ नसल्याने आताही भंडारा येथूनच सर्व कारभार हाकला जात आहे. परिणामी जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देता येत नाही व येथे सर्वांना रान मोकळे आहे. परवानगी घेतली किंवा नाही घेतली याचे काहीच फरक पडत नसल्याचे चित्र आहे.