शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुलाजवळ जीवघेणा रस्ता

By admin | Updated: July 22, 2015 02:08 IST

कातुर्ली गावाजवळून राज्य शासनाचा चौपदरी रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्ता सितेपारपर्यंत पोहचला. मात्र रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे,

आमगाव : कातुर्ली गावाजवळून राज्य शासनाचा चौपदरी रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्ता सितेपारपर्यंत पोहचला. मात्र रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे, त्याकडे बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. कातुर्ली कालव्यावरील पुलाजवळ डांबरीकरणाचा मोठा ढिग निर्माण झाला आहे. या ठिकाणी रात्रीला अनेकदा दुचाकीस्वारांचा अपघात होतो. मात्र प्रशासनाला अद्याप जाग आली नाही. कलानवरगाव, कातुर्ली, सितेपारपर्यंत सदर डांबरीकरण रस्ता कोट्यवटी रूपये खर्चून तयार करण्यात आला. सितेपारनंतर पुढे हा मार्ग कुठे जाणार, याची साधी पुसट कल्पनाही कुणालाच नाही. करोडो रुपये खर्च करून तयार झालेला रस्ता दुरावस्थेत आहे. या रस्त्याच्या वाली कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कातुर्ली गावाजवळ डांबरीकरणाचा ढिग पुलाच्या दोन्ही बाजूला तयार झाला आहे. रात्री दुचाकी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ते एक आव्हान आहे. अनेक दुर्घटना या ठिकाणी झाल्या आहेत. अनेकांना दुखापत झाली. मात्र संबंधित प्रशासनाला तक्रार करूनही जाग आली नाही. तयार करण्यात आलेला हा रस्ता नेमका कोणत्या गावावरून जाणार व प्रवाशांना किंवा नागरिकांना कोणता फायदा आहे, याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. सध्या या रस्त्याचे काम पूर्णपणे बंद आहे. निधी उपलब्ध नाही किंवा समोर रस्ता नेणे कठीण आहे, याची कल्पना कुणालाच नाही. मात्र रस्त्याच्या दैनावस्थेमुळे सदर रस्ता दुचाकी प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे व दुर्दशा झालेल्या ठिकाणी दुरूस्ती करण्याची मागणी जैतवार गुरूजी, छोटू शहारे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)