शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

उपोषणकर्त्याला रुग्णालयात हलविले

By admin | Updated: December 16, 2014 22:54 IST

आमरण उपोषणाला बसलेल्या इसमाला तिसऱ्या दिवशी प्रकृती बिघडल्यामुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र निगरगट्ट प्रशासनाने सहाव्या दिवशीपर्यंत यावर तोडगा काढला नाही.

अर्जुनी/मोरगाव : आमरण उपोषणाला बसलेल्या इसमाला तिसऱ्या दिवशी प्रकृती बिघडल्यामुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र निगरगट्ट प्रशासनाने सहाव्या दिवशीपर्यंत यावर तोडगा काढला नाही. बरडटोली येथील रवी व्यंकय्या कुदरूपाका यांनी विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरपासून स्थानिक पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली. अरविंद बोरकर यांच्या घरकुल प्रकरणात लाभार्थी व ग्रामसेवक जी.के.बावणे यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कुदरूपाका यांनी मागणी केली आहे. पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जी.डी.कोरडे यांनी लाभार्थी बोरकर यांचेवर १० डिसेंबरपर्यंत तर ग्रामसेवक बावणे यांचेवर वरिष्ठांकडून परवानगी मिळाल्यानंतर पोलिसात तक्रार करण्याचे लेखी आश्वासन कुदरूपाका यांना दिले. मात्र कोरडे यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. यासाठी हे उपोषण आरंभण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात खंडविकास अधिकारी कोरडे यांची भूमिका संशयास्पद आहे. कोरडे यांचे या प्रकरणात हात ओले झाल्याचा आरोप उपोषणकर्त्याने केला आहे. त्यांचेवर कारवाई झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका त्याने घेतली आहे. ग्रामसेवक बावणे यांचा या प्रकरणातून बचाव करण्यासाठी हा संपूर्ण डाव रचला जात असल्याचे सांगण्यात येते. खंडविकास अधिकाऱ्यांनी बावणे यांचेवर कारवाई करण्याचा प्रस्ताव मार्गदर्शनासाठी वरिष्ठांकडे पाठविला आहे. अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. (तालुका प्रतिनिधी)