रविवारी आॅडीशन राऊंड : विजेत्यांसाठी लाखोंचे पुरस्कारगोंदिया : लोकमत युवा नेक्स्ट, बाल विकास मंच व फॅमीना फॅशन डिजाईन कॉलेज यांच्या संयुक्तवतीने फॅशन शो व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आॅडीशन राऊंड व फायनल राऊंड अशा दोन टप्यात ही स्पर्धा घेतली जाईल. यात ३१ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजतापासून सिंधी मनिहारी धर्मशाळेत आॅडीशन राऊंड घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांची अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समुहाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने लोकमतने युवा वर्गासाठी युवा नेक्स्ट, बालकांसाठी बालविकास मंच व महिलांसाठी सखी मंच असे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करवून दिले आहे. शिवाय लोकमत समुह विविध माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नेहमीच पुढे येतो. याच उद्देशातून लोकमत समुह व फॅमीना फॅशन डिजाईन कॉलेज संयुक्तरित्या येत्या २८ सप्टेंबर रोजी फॅशन शो व नृत्य स्पर्धा घेऊन येत आहे. यात प्रथम फेरी म्हणजेच आॅडीशन राऊंड ३१ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. नृत्य स्पर्धेसाठी पहीला गट ५ ते १५ वर्षे वयोगटाचा असून दुसरा गट १५ पेक्षा जास्त वयोगटाच्या विद्यार्थ्यांचा राहील. नृत्य स्पर्धेत एकल व समुह अशा दोन फेऱ्या राहतील. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या फॅशन शोमध्ये वेर्स्टन व ट्रेडिशनल हे दोन विषय राहणात आहेत. यात बेस्ट मॉडेल मेल, बेस्ट मॉडल रनरअप, बेस्ट मॉडल फिमेल, बेस्ट मॉडल रनरअप, बेस्ट कपल, बेस्ट कपल रनरअप यांची निवड केली जाईल. स्पर्धेसाठी १०० रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)
फॅशन शो व नृत्य स्पर्धा
By admin | Updated: August 28, 2014 23:54 IST