शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी होणार समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:12 IST

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागातर्फे तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन विभागातील नवीन कालवे व कालवे दुरुस्तीकरिता ५ कोटी ८४ लाख मंजूर झाले आहेत. सदर कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचन विषयक भेट शासनाने दिलेली आहे. त्यातून शेतकरी समृद्ध होणार आहेत.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : जलसंपदा विभागातर्फे ५.८४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागातर्फे तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन विभागातील नवीन कालवे व कालवे दुरुस्तीकरिता ५ कोटी ८४ लाख मंजूर झाले आहेत. सदर कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचन विषयक भेट शासनाने दिलेली आहे. त्यातून शेतकरी समृद्ध होणार आहेत.यावर्षी अल्प पावसामुळे जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. शेतकऱ्यांना रब्बी पीक लावण्यास शासनाने मनाई केल्यामुळे आ. विजय रहांगडाले यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाण्यासाठी जुने कालवे दुरुस्ती तसेच कालव्यांची लांबी वाढविण्याची मागणी केली होती. त्यावर शासनाने मंजुरी देत ५ कोटी ८४ लाख रूपये मंजूर केलेले आहे.यामध्ये चिरेखनी लघू कालवा बांधकामाकरिता ३५ लाख, कवलेवाडा वितरिकेच्या २ उजवा लघू कालव्यांच्या बांधकामाकरिता २५ लाख, मुख्य कालवा व त्यावरील लघू कालव्याची तसेच तिरोडा वितरिका व त्यावरील लघूकालव्याच्या दुरुस्तीकरिता ४५ लाख, कवलेवाडा वितरिकेच्या ४ (डावा) लघू कालव्यांच्या बांधकामाकरिता १.१७ कोटी, मरारटोला-कवलेवाडा रस्त्यावरील व कवलेवाडा वितरिकेवरील लहान पुलाचे बांधकाम १० लाख, कवलेवाडा वितरिका व त्यातील लघू कालव्याची दुरुस्तीची कामे १५ लाख, खैरबंदा उर्ध्वनलिकेवर माती भरावयाच्या कामाकरिता २५ लाख, धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ च्या कळप्रांगणाच्या बांधकामासाठी १.८० कोटी, धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ च्या बॅरेज मीटर रुमच्या बांधकामाकरिता ७० लाख, सालेबर्डी पुच्छ कालव्याच्या बांधकामाकरिता ३५ लाख, सालेबर्डी २ (उजवा) तिरोडा वितरिका व ११ (डावा) मुख्य कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाकरिता १५ लाख, मुख्य कालव्यावरील मुंडीपार गावाजवळ दोन पुलांच्या दुरुस्तीच्या कामाकरिता ५ लाख, मुख्य कालव्याच्या ४ उजव्या कालव्यांवरील उपलघू कालव्यांचे उर्वरित बांधकामाकरिता ७ लाख रूपये आदी बांधकामांचा समावेश आहे.या सर्व बांधकामाचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते माजी आ. वैद्य यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. या वेळी कृउबास सभापती डॉ.ंिचंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, कार्यकारी अभियंता पृथ्वी फालके, सहायक अभियंता निखिल अहिरवार, उपअभियंता पंकज गेडाम, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, पं.स. सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, पवन पटले, कृउबास संचालक घनशाम पटले, पिंटू रहांगडाले, सरपंच किरण पारधी, गुलाब कटरे, वासुदेव हरिणखेडे, वनिता नागपुरे, प्रकाश भोंगाडे, विनोद लिल्हारे, सुनील अटराहे, योगशिला पारधी, अनिल मरस्कोल्हे, मंगला खेवले, स्वप्नील बन्सोड, जयसिंग उपासे व मोठ्या संख्येने गावकरी व संबंधित यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते.