शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नेटवर्क शोधात शेतकरी धुऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST

गोरेगाव : शेतकऱ्यांनी स्वत:च्या खरीप धानपिकाची माहिती स्वत: ॲण्ड्राईड मोबाईलद्वारे भरावी व इतर योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी ई-पीक पाहणी ...

गोरेगाव : शेतकऱ्यांनी स्वत:च्या खरीप धानपिकाची माहिती स्वत: ॲण्ड्राईड मोबाईलद्वारे भरावी व इतर योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी ई-पीक पाहणी ॲप्सकरिता लिंक दिली. परंतु तालुक्यात मोबाईल नेटवर्क सुविधा फोरजी असूनसुद्धा काम करत नसल्याने ही ई-पीक पाहणी मोहीम नेटवर्कअभावी अडचणीत आली आहे. तर पीक नोंदणीसाठी शेतकरी नेटवर्कच्या शाेधात धुऱ्यावर असल्याचे चित्र आहे.

सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नवीन तंत्राचा वापर करुन ई-पीक पाहणी ॲप्स तयार केला. त्यात लिंक देण्यात आल्याने मोबाईल नेटवर्कची गरज आहे. तालुक्यात फोरजी नेटवर्क सेवा देण्यासाठी मोठमोठे टॉवर लावले गेले आहेत. परंतु ही सेवा टूजी सेवेपेक्षा कमकुवत असल्याने अनेक शेतकऱ्यांना ही लिंक उघडता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ॲप्समध्ये पिकाची नोंद करताना अडचण निर्माण होत आहे. दरम्यान, सरकारने कृषी विभाग, तलाठी, ग्रामसेवकांना ई-पीक पाहणीचे काम द्यावे, अशी मागणी होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या इतर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सरकारने पाऊल उचलण्याची गरज आहे. असेही बोलले जात आहे.

कोट......

सरकारने नेटवर्कची समस्या आधी सोडवावी, नाही तर ई-पीक पाहणी मोहीम शेतकऱ्यांकडून न राबविता तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांकडून राबवावी, शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा.

-चिंतामण बिसेन, शेतकरी

बॉक्स.....

तलाठ्यांना प्रशिक्षण मग शेतकऱ्यांना का नाही?

सरकारने २० सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी करण्याची मुदत दिली आहे. त्याशिवाय विमा, कर्ज व योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. पण खेड्यापाड्यात मोबाईल नेटवर्क सुविधा सुरळीत करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. पिकांची नोंदी लिहून घेण्यासाठी तलाठ्यांना ॲप्स कसे उघडावे, नोंदी कशा घ्याव्यात, याचे प्रशिक्षण देण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना वगळण्यात आले. त्यातच गावातील महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या ग्रामसेवक व कृषी विभागास कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नो नेटवर्कमध्ये ई-पीक पाहणी कशी करावी? असा प्रश्न पडला आहे.