शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या कनेक्शनसाठी शेतकऱ्यांची धाव

By admin | Updated: April 18, 2016 04:08 IST

शेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून पंप चालविले जातात. मात्र हे पंप आता आपल्या स्वत:च्या कनेक्शनवरून

कपिल केकत ल्ल गोंदियाशेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून पंप चालविले जातात. मात्र हे पंप आता आपल्या स्वत:च्या कनेक्शनवरून चालविण्याप्रती शेतकरी जागरूक झाला असून कृषी पंप कनेक्शनसाठी शेतकरी धाव घेत आहेत. हेच कारण आहे की, वीज वितरण कंपनीकडे कृषीपंपांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. यंदा मार्च पर्यंत वीज कंपनीने जिल्ह्यात ३६४१ कनेक्शन केले आहेत.वीज चोरीच्या प्रकारात जिल्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत नेहमीच राहतो. वीज चोरीच्या या प्रकारांमुळे वरिष्ठांकडून जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. परिणामी जिल्हास्तरावर मोहिम छेडून वीजचोरांवर कारवाई केली जाते. अशात जे शेतकरी अवैधरित्या वीज घेऊन पंप चालवितात त्यांच्यावरही गाज पडते व मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागतो. एकंदर फायद्यासाठी केलेले काम तोट्यात जाते. आपल्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्याला कृषी पंपांसाठी कनेक्शन देण्यात यावे यासाठी शासन ही प्रयत्नशील असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातूनही राबविल्या जात आहेत.त्यामुळे वीज चोरीचा प्रकार टाळून स्वत:चे हक्काचे कनेक्शन घेऊनच आपला पंप चालवावा एवढी जागरूकता आता शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कृषी पंप कनेक्शनसाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करीत आहेत. यंदा मार्च २०१६ पर्यंत वीत वितरण कंपनीने जिल्ह्यात ३६४१ शेतकऱ्यांना कृषी पंप कनेक्शन दिले आहेत. या कामगिरीवरून जिल्हा कृषी पंप जोडणीत राज्यात अव्वल देखील ठरला आहे हे विशेष. तर शेतकऱ्यांची ही जागरूकता बघता वीज वितरण कंपनीकडूनही निधीच्या उपलब्धेनुसार शेतकऱ्यांच्या या अर्जांवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे.पाच हजार कनेक्शनचे नियोजन ४कृषी पंप जोडणीसाठी शेतकऱ्यांना जास्त काळ वाट बघावी लागू नये यासाठी वीज कंपनीकडून नेहमीच कार्य केले जात आहे. त्यात आता यंदा पाच हजार कनेक्शनसाठीचे नियोजन केले जात असल्याचे अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण यांनी सांगीतले. यासाठी निधी उपलब्ध होताच काम सुरू केले जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगीतले. वीज कंपनीकडे २२०७ पेड पेंडिंग ४वीज कंपनीने ३६४१ शेतकऱ्यांना मार्च पर्यंत कनेक्शन दिले असले तरिही अर्जांची संख्या काही कमी झाली नसून आजही कंपनीकडे २२०७ पेड पेंडिंग (डिमांड भरलेले) अर्ज आहेत. तर येत्या एप्रिल ते मार्च या कालावधीत आणखी सुमारे तीन हजार अर्ज येण्याची शक्यताही अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे.