शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जोडधंद्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार ४०३ गोठे

By admin | Updated: May 16, 2017 00:57 IST

तालुक्यात शेतकऱ्यांना व्ययक्तीक लाभाच्या योजनेतून गुरांचे गोठे मिळणार आहेत. ४०३ लाभार्थ्यांसाठी जि.प. स्थायी समतीच्या सभेत मंजुरी मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यात शेतकऱ्यांना व्ययक्तीक लाभाच्या योजनेतून गुरांचे गोठे मिळणार आहेत. ४०३ लाभार्थ्यांसाठी जि.प. स्थायी समतीच्या सभेत मंजुरी मिळाली आहे.जि.प. गोंदिया अंतर्गत अनेक दिवसांपासून जनावरांसाठी गोठे, शेळी व कुक्कुट पालनासाठी शेड यासाठी प्रस्ताव प्रलंबित होते. परंतु स्थायी समितीचे सदस्य सुरेश हर्षे यांनी सदर प्रकरणाचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांसाठी ४०३ गोठे व शेड मंजूर करवून घेतले. जि.प. गोंदियाच्या व्यवक्तीक लाभाच्या योजनेत शेतकऱ्यांकरिता शेळी पालन, कुक्कुट पालन यासाठी शेड व जनावरांचे गोठे तयार केले जाणार आहेत. त्यामागे शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावणे व रोजगार निर्माण करणे, हा हेतू आहे. निधी मंजूर झाला असून स्थायी समितीच्या सभेत कामे सुरू करण्याविषयी माहिती देण्यात आली.अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना शेतीसह जोडधंदा मिळावा यासाठी जनावरे, शेळी पालन, कुक्कुट पालन यासाठी शेड व गोठे उपलब्ध व्हावे यासाठी जि.प. सदस्य सुरेश हर्षे प्रयत्नशील होते. अनेकदा त्यांनी या मुद्यांवर स्थायी समितीची सभा गाजविली. राजकारण व कागदोपत्री संघर्षानंतर अखेर ११ मे रोजी स्थायी समितीत बोदा, ठाणा, वळद, सुपलीपार, सावंगी, खुर्शीपारटोला, पद्मपूर, माल्ही, फुक्कीमेटा, गिरोला, तिगाव, धामणगाव, आसोली, जवरी, बोथली, जामखारी, बनगाव, भोसा, कुंभारटोली, गोसाईटोला, टाकरी, कालीमाटी, कातुर्ली, करंजी, कट्टीपार आदी गावांसाठी सदर लाभ मंजूर करण्यात आला आहे. असा मिळणार लाभआमगाव तालुक्यातील ४०३ लाभार्थ्यांसाठी मंजुरी मिळाली आहे. यात जनावरांच्या गोठ्यासाठी प्रति लाभार्थी एक लाख ११ हजार २०० रूपये प्रति लाभार्थी, शेळ्यांच्या शेडसाठी ५५ हजार २०० रूपये प्रति लाभार्थी व कुक्कुट पालनाच्या शेडसाठी ४८ हजार रूपये प्रति लाभार्थी असा लाभ मिळणार असल्याचे जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांनी सांगितले.