शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयावर शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:29 IST

सन १९३६ मध्ये देशात पहिल्यांदा शेतकºयांची संघटना स्थापन करण्यात आली. तेव्हापासून अखिल भारतीय किसान सभा १ सप्टेंबर हा मागणी दिवस म्हणून साजरा करते.

ठळक मुद्देतहसीलदारांना दिले निवेदन : मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सन १९३६ मध्ये देशात पहिल्यांदा शेतकºयांची संघटना स्थापन करण्यात आली. तेव्हापासून अखिल भारतीय किसान सभा १ सप्टेंबर हा मागणी दिवस म्हणून साजरा करते. या निमित्ताने बस स्थानकावरुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव व मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात शेतकरी व शेतमजुरांचा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.केंद्रात व राज्यात विद्यमान सरकार आल्यापासून कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणात कमी होण्याऐवजी वाढच झाली आहे. दिवसागणिक ती वाढ होत आहे. हा प्रकार आता धान पट्यातही पोहोचला आहे. यावर तातडीचा उपाय म्हणून शेतकºयांची सरसकट कर्जमाफी ही आहे.मात्र फडणवीस सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी सिध्द होत अहे. तेव्हा सरसकट कर्जमाफी देऊन शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यात यावा. केंद्र व राज्य सरकारच्या प्रमुखांनी निवडणुकीत घसा कोरडा होईपर्यंत डरकाळ््या फोडून स्वामीनाथन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. पण आता केंद्र सरकारने यावर असमर्थता दर्शविली आहे. देशातील शेतकºयांची ही फसवणूक दूर करण्यात यावी व तात्काळ स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा. वनाधिकारी कायदा २००५ मधील इतर पारंपरीक वननिवासी तथा गैरआदिवासींकरिता असलेली तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी. वनाधिकार कायद्याखाली दावे सादर करणाºयांचे दावे प्रक्रिया प्रकरणात दावेदारांना काहीच माहिती दिली जात नाही. तेव्हा त्यांना याबद्दल संधी देण्यात यावी. जिल्हा वनहक्क समितीने दावा फेटाळल्यास त्यांना राज्य सनियंत्रण समितीकडे दाद मागण्यांची सोय करुन देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.गोंदिया, मुंडीपार ता.सडक-अर्जुनी येथील किसान ग्रामपंचायत व नागरिकांनी केलेल्या मागणीप्रमाणे त्या गावातील तलावाची खासगी मालकी असलेली नोंद रद्द करुन ती सार्वजनिक तलाव अशी नोंद करण्यात यावी. तलावाचे नियंत्रण अधिकार संबंधित ग्रामपंचायत किंवा शासकीय एजेन्सीला देण्यात यावे, या मागणीचा सुद्धा निवेदनात समावेश आहे.सदर मोर्चात मिलिंद गणवीर, अशोक मेश्राम, ललित वैद्य, जोमा बावणकर, उध्दव कडुकार, दमयंता वासनिक, धनलाल रंगारी, नाजुकराव मेश्राम, मूलचंद बंसोड आदीउपस्थित होते.