शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ‘जलयुक्त’चा आधार

By admin | Updated: October 2, 2016 01:36 IST

धानावर प्रक्रिया करणारे लहान-मोठे उद्योग आणि मुख्य पीक म्हणून धानाचे उत्पादन यामुळे जिल्हयाला ‘धानाचे कोठार’ अशी ओळख मिळाली आहे.

उत्पादन वाढणार : म्हसवाणी परिसरात विहिरींमध्ये पाणीपातळी वाढलीगोंदिया : धानावर प्रक्रिया करणारे लहान-मोठे उद्योग आणि मुख्य पीक म्हणून धानाचे उत्पादन यामुळे जिल्हयाला ‘धानाचे कोठार’ अशी ओळख मिळाली आहे. पण पावसाचा लहरीपणा, अनियमतिपणा, दुष्काळी परिस्थिती, नापिकी यामुळे शेतकरी नेहमीच संकटात सापडत होता. आता जलयुक्त शिवार अभियान राबविल्यामुळे म्हसवाणी परिसरातील सिंचन विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून शेतकऱ्यांची कोरड्या दुष्काळाच्या चिंतेतून मुक्तता होणार आहे.पावसामुळे कधी कधी दुबार तिबार पेरणी करावी लागायची. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची व्हायची. लहान शेतकरी तसेच सर्वसामान्य शेतकरी कर्ज घेऊन शेतीची कामे करायचे पण, पावसाच्या लहरीपणाचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होऊन शेतकरी कर्जात बुडायचा.शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याचा शेतीच्या कामासाठी पुरेपूर वापर करण्यासाठी म्हसवाणी या छोटयाशा गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१४-१५ या पाहिल्याच वर्षी निवड करण्यात आली. या अभियानातून पाणी उपलब्ध झाल्यामुळे म्हसवाणीच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. सोबतच धानाचे उत्पादनही वाढले आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी या छोटयाशा गावाची लोकसंख्या १४४५ इतकी आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र २७६.९० हेक्टर आहे. पिकाखाली एकूण क्षेत्र २२०.५० हेक्टर आहे. भात हे मुख्य पिक असून या पिकाखाली १८६ हेक्टर क्षेत्र आहे. म्हसवाणी या छोटयाशा गावात दारीद्रय रेषेखाली जीवन जगणारेही शेतकरी आहेत. सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या शेतात १८ विहीरी व ८ बोरवेल्स आहे. परंतू छोटया शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करावी लागत होती. शेतशिवारातून लहानसा नाला वाहत गेला आहे. पण या नाल्याचे पाणी पावसाळयाच्या दिवसात वाहून जात होते. जलयुक्त शिवार अभियानातून या नाल्यावर दोन बंधारे बांधल्यामुळे पावसाचे पडणारे पाणी अडविल्या जावू लागले. त्यामुळे नाल्यात पाणी साठवू लागल्यामुळे भुर्गभातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. विहीर व विंधन विहीरींची पातळी वाढली. नाल्याच्या दोन्ही काठावरील शेतीला पाण्यामुळे मदत झाली. पुर्वी या शेतकऱ्यांना नाल्याचा उपयोग होत नव्हता. जलयुक्तमुळे पाण्याची उपलब्धता झाली. पुर्वी या शेतकर्यांना पाण्याची उपलब्धता होत नसल्यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठी घट व्हायची. कधी कधी तर एका पाण्याच्या अभावी हातचे पीक जायचे. मागील दोन वर्षात शेतीच्या उत्पादनातील पैसेवारी कमी आल्याने म्हसवाणी टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले होते. पण आता तिथे बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे नाला तुडूंब भरलेला आहे. या साठविलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळी तसेच पावसाळी पिकासाठी होईल असे गावातील शेतकरी सांगत आहेत. जलयुक्त शिवार योजनेमूळे गावातील शेतकर्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)सिमेंट बंधाऱ्यामुळे जलसाठ्यात वाढम्हसवाणी टंचाईग्रस्त असल्यामुळे या गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली. शेतशिवारातून वाहत असलेल्या नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कृषी विभागाकडून २.७० मीटर उंच व ८.८६ मीटर लांबीच्या सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. या बंधाऱ्यातून पाणी साठवणुकीची क्षमता ८.९८ दशलक्ष घनमीटर एवढी निर्माण झाली. दुसऱ्या बंधाऱ्यातून पाणी साठवणूक क्षमता ८.९८ दशलक्ष घनमीटर एवढी निर्माण झाली. साठविलेल्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी करण्यात येत आहेत. साठविलेल्या पाण्यापासून विहीरी व इतर जलाशयातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानामूळे व शेतातील डोलदार धानाच्या पिकाकडे पाहून शेतीच्या उत्पादनात यावर्षी निश्चित वाढ होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.