लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील शेतकरी पुनर्वसू नक्षत्रात रोवणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मागील १५-२० दिवसांपासून परिसरात पाऊस न झाल्याने रोवणीची कामे खोळंबली होती. मात्र पुनर्वसू नक्षत्रातील पावसाने दमदार हजेरी लावल्याने या परिसरातील रोवणीच्या कामाला वेग आला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय म्हणून विंधन विहिरी तयार करून सिंचनाची सोय केली आहे. त्यामुळे हमखास पिके घेतली जातात. पण जिथे पाण्याची सोय नाही त्याठिकाणी नैसर्गिक पावसावरच अवलंबून राहावे लागते. परसोडी, वडेगाव, चिखली, कोहमारा, कणेरी, पुतळी या गावात सिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना वरथेंबी पावसावरच अवलंबून राहावे लागते. सडक अर्जुनी तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र ५५ हजार ४६० हेक्टर आर. क्षेत्र असून १९३५० हेक्टर आर क्षेत्र खरीप पिकाखाली आहे. त्यात २९५ हेक्टर आर क्षेत्रावर आवत्या धानाची लागवड केली आहे. पुनर्वसू नक्षत्रात आतापर्यंत ३५ टक्के रोवणी झाली आहे.तालुक्यात ४० टक्के बारीक, तर ६० टक्के जाड धान पिकाचे लागवड केली आहे. यावर्षी हायब्रीड व कमी दिवसात येणाºया धानाची लागवड केली आहे.वातावरणातील बदलाचा परिणाम धानाच्या शेतीवर होत आहे. त्यामुळे भाजीपाला, केळी, टरबूज, खरबूज, भेंडी, काकडी आदी पिकांच्या लागवडीकडे शेतकरी वळत आहेत.- जोशिराम लंजेशेतकरी सिंदिपारगेल्या २ दिवसांत पाऊस बऱ्याच प्रमाणात झाल्याने तालुक्यातील रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यात सध्या ३५ टक्के रोवणी झाली आहे. कीड व रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.- किशोर पात्रीकरतालुका कृषी अधिकारी, सडक अर्जुनी
पुनर्वसू नक्षत्रात शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST
तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय म्हणून विंधन विहिरी तयार करून सिंचनाची सोय केली आहे. त्यामुळे हमखास पिके घेतली जातात. पण जिथे पाण्याची सोय नाही त्याठिकाणी नैसर्गिक पावसावरच अवलंबून राहावे लागते. परसोडी, वडेगाव, चिखली, कोहमारा, कणेरी, पुतळी या गावात सिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना वरथेंबी पावसावरच अवलंबून राहावे लागते.
पुनर्वसू नक्षत्रात शेतकरी सुखावला
ठळक मुद्देतालुक्यात हलक्या धानाची अधिक लागवड : सिंचनाची सोय नाही