शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी दिंडीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:36 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी खाडीपार येथील विठ्ठल रुखमाई मंदिरातून सुरुवात करण्यात आली. सदर दिंडी माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : शेतकऱ्यांची नव्हे कार्पोरेटची सरकार

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी खाडीपार येथील विठ्ठल रुखमाई मंदिरातून सुरुवात करण्यात आली. सदर दिंडी माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. अविनाश काशिवार, नरेश माहेश्वरी, दिलीप बन्सोड, रमेश चुऱ्हे, गजानन परशुरामकर, नरेश भेंडारकर, सेवकराम रहांगडाले, माधव हटवार, निरज मेश्राम, रहांगडाले, एफ.टी. शहा, बाबोडे, दादोजी परशुरामकर, सुधाकर पंधरे, अग्रवाल, आनंद परशुरामकर, दामोदर बोपचे, परिसरातील सरपंच व उपसरपंच दिंडी अभियानात सहभागी झाले होते.शेतकरी दिंडी अभियानाची सुरुवात होण्यापूर्वी प्रदेश प्रतिनिधी किसान सभा अध्यक्ष मनोहर चंद्रिकापूरे यांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक केली जात असून शासनाने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकºयांना मिळाला नसल्याचे सांगत सर्व कर्ज माफ करण्याचे मागणी केली. सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना उत्पादक खर्चाचा दिडपट भाव देणे, ३०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बोनस जाहीर करणे गरजेचे आहे, परंतु शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही सरकार शेतकऱ्यांची नाही कार्पोरेट लोकांची असल्याचे ते म्हणाले.यावेळी माजी आ. राजेंद्र जैन यांनी सरकाच्यजा कानपिचक्या घेतल्या. ते म्हणाले, शरदचंद्र पवार यांनी शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ केले होते. परंतु या परिसरातील मंत्री असून सुद्धा सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी परिसरातील शेतकºयांचा दुष्काळ घोषित करण्यात आला नाही. तिरोडा, गोरेगाव, गोंदिया तहसीलचा सर्व शेतकऱ्यांचा मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला. त्यामुळे येणाºया ३० डिसेंबरला जेलभरो आंदोलन खा. प्रफुल्ल पटले यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अधिक संख्येत भाग घेण्याचे आवाहन केले.शेतकरी दिंडी अभियान २५ ते २९ डिसेंबर २०१७ पर्यंत पांढरी, डव्वा, सौंदड, चिखली, शेंडा अशा प्रकारे जिल्हा परिषद क्षेत्रातील गावामध्ये दिंडी काढून सर्व शेतकरी जनतेला शासन विषयी जनजागृती करण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका सडक अर्जुनी अवलंबविण्यात आले आहे.संपूर्ण सडक-अर्जुनी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणी या दिंडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.