शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर

By admin | Updated: July 31, 2016 00:33 IST

जय जवान, जय किसान असे घोषवाक्य असले तरी शेतकरी याला अपवाद ठरला आहे.सुकळी, चारगाव,

कारखान्यांना दिली वीज : ढोरवाडा, सुकळी, माडगी, चारगाव कृषीपंपाचा वीज पुरवठा बंद तुमसर : जय जवान, जय किसान असे घोषवाक्य असले तरी शेतकरी याला अपवाद ठरला आहे.सुकळी, चारगाव, ढोरवाडा व माडगी शेतशिवारात मागील नऊ दिवसापासून कृषी पंपाचा वीज पुरवठा बंद आहे. धानाचे पीक माना खाली टाकत आहे. शेतात भेगा पडणे सुरू झाले आहे. दुसरीकडे या परिसरातील कारखान्यांना मात्र नियमित वीज पुरवठा करणे सुरू आहे. याविरोधात आज शेकडो शेतकऱ्यांनी तुमसर तहसील गाठून तहसीलदारांना निवेदन देवून रोष व्यक्त केला. २१ जुलै रोजी माडगी देव्हाडी येथे ११ के.व्ही. उप केंद्रात मोठा स्फोट झाला. शहरासह सुमारे ६० गावे अंधारात बुडाली होती. वीज अभियंत्यांनी घरगुती वीजपुरवठा चार तासांनी दुसरीकडून सुरू केला. २८ जुलै रोजी या परिसरातील क्लेरियन ड्रग कंपनी, युनिडेरींडेंट कारखाना, एलोरा पेपर मील व वैनगंगा शुगर अ‍ॅन्ड पॉवर कंपनीला दुसरीकडून वीज पुरवठा करण्यात आला. मोहाडी तालुक्यातील रोहा, बेटाळा परिसरातील गावांना भंडारा येथून वीज पुरवठा करण्यात येत आहे. देव्हाडी परिसरातील ढोरवाडा, सुकळी, चारगाव व माडगी या गावातील कृषी पंपाचा वीजपुरवठा अद्याप बंद आहे. शेतातील धान पीक पिवळे पडले आहे. शेतात पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. विहिरीत पाणी आहे, परंतु वीज नाही. मागील दहा दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहे. जो पैसा रोवणी, शेतीच्या मशागतीवर खर्च केला तो येथे व्यर्थ जाण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावीत आहे. यापेक्षा धान पेरणी व रोवणी केली नसती तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया आता शेतकरी देत आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी रोहित्र दुरूस्ती करीत आहेत. परंतु त्यांना अद्याप यश आले नाही. केवळ येथे वेळ मारून नेली जात आहे. शुक्रवारी ढोरवाडा व सुकळी येथील शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून प्रभावी तहसीलदार निलेश गोंड यांना व्यथा सांगितली व निवेदन दिले. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी तथा आमदार चरण वाघमारे यांच्या कार्यालयात निवेदन दिले. वीज वितरण कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचात तक्रार करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. येथे आंदोलन करण्यापेक्षा सामूहिक आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. शेतकऱ्यांमध्ये श्रीधर बोंदरे, भाऊलाल बांडेबुचे, माणिक बोंदरे, विठ्ठल बोंदरे, लक्ष्मण बोंदरे, सुरेश चौधरी, लंकेश जगनाडे, दिलीप सपाटे, मधुकर गोमासे, शिवदास बुद्धे, सचिन ठवकर, ग्यानीराम बोंदरे, लक्ष्मण ठवकर, अंकुश बुद्धे, दिलीप बोंदरे, नामदेव बोंदरे, देवदास बोंदरे, शंकर कुकडे, श्यामलाल भोयर, भागवत बोंदरे, कृष्णा कुकडे, प्यारेलाल बांडेबुचे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)