शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सिंचनाच्या पाण्यापासून वंचित

By admin | Updated: January 12, 2016 01:42 IST

कवलेवाडा ग्रामपंचायतच्या सभागृहात शेतकऱ्यांसाठी मिळणाऱ्या धापेवाडा टप्पा-१ च्या पाण्यासंबंधीची सभा पार पडली.

रहांगडाले : धापेवाडा उपसा सिंचन अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणातिरोडा : कवलेवाडा ग्रामपंचायतच्या सभागृहात शेतकऱ्यांसाठी मिळणाऱ्या धापेवाडा टप्पा-१ च्या पाण्यासंबंधीची सभा पार पडली. यात धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी पाण्यापासून वंचित होत आहेत, असे मत डॉ. रहांगडाले यांनी व्यक्त केले.अध्यक्षस्थानी डॉ. सुशील रहांगडाले होते. याप्रसंगी प्रामुख्याने डॉ.बी.एस. रहांगडाले, ईश्वरदयाल रहांगडाले, माजी पं.स.सभापती प्रभू पटले, जगदिश कटरे, देवलन पारधी, स्वाती चौधरी उपस्थित होते. सभेतील अनेक शेतकऱ्यांनी चर्चेत भाग घेतला व आपली मते प्रदर्शित केली. धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे अधिकारी जाणूनबुजून शेतकऱ्यांकडून वसुली करीत नसून जेणेकरून वसूली न झाल्याच्या नावावर पाणी देणे बंद करावे लागेल. वसुली न झाल्याने यावर्षी रबी पिकांसाठी पाणी मिळणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अगोदरच यावर्षी पीक फारच कमी प्रमाणात झाले. कधी रोगांचा प्रादुर्भाव तर कधी पाण्याची कमतरता, याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-१ वर विद्युत बिल ३० लाख रूपये बाकी आहे. त्याची परिपूर्ती होणे आवश्यक आहे. ते न झाल्यास रबी धानासाठी पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी घरोघरी जावून वसूली करणे गरजेचे आहे. यात कवलेवाडा, मरारटोला, पुजारीटोला, चिरेखनी, बेलाटी खुर्द, बेलाटी बु., मुंडीपार, मांडवी, सालेबर्डी या गावांतील ४०० हेक्टर जमिनीचा समावेश आहे. येथील शेतकऱ्यांवर ५० लाख रुपये खरीप पाण्याचे बाकी आहेत. अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून गावोगावी जाऊन वसुली न केल्याने वसुली होत नाही. त्यामुळे पाणी वाटपातून सूट मिळेल, अशी भावना असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी दोन-तीन वर्षांपूर्वी ९९ टक्के वसुली होत असल्याचे बोलले जाते. लवकरात लवकर शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचे सभेत ठरविण्यात आले. सभेला संबंधित गावांतील सरपंच तसेच प्रतिष्ठीत नागरिक व शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)