शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

अवकाळीने शेतकऱ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

हवामान विभागाने जिल्ह्यात ३१ ते ३ जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. मंगळवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे याचा रब्बी पिकांचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देकेंद्रावरील धान भिजले : धानाला फुटले अंकुर, बळीराजा संकटात, मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. गुरूवारी सकाळी सुध्दा अवकाळी पावसाने हजेरी लावली.परिणामी शासकीय धान खरेदी केंद्रावरील उघड्यावर असलेले धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरेदी केंद्रावर छल्ली मारून ठेवलेल्या धानाला अंकुर फुटू लागल्याने हे धान कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. हरभरा, गहू, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामाला सुध्दा मुकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.हवामान विभागाने जिल्ह्यात ३१ ते ३ जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. मंगळवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे याचा रब्बी पिकांचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे. यामुळे गुरुवारी दिवसभर गारव्यामुळे हुडहुडी कायम होती. सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव, सालेकसा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतातील बांध्यामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे धान वगळता इतर कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे हरभरा आणि गहू हे दोन्ही पीक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे. जिल्ह्यात यंदा ३६ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे. यात २६ हजार हेक्टरवर धान तर १० हजार हेक्टरवर हरभरा, गहू आणि इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पाऊस धानासाठी अनुकुल असला तरी इतर कडधान्य पिकांसाठी तो नुकसानकारक आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रब्बी हंगामात हे नुकसान भरुन काढू अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र परतीच्या पावसाने त्यावर पाणी फेरल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढावले आहे.जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत धान खरेदी केली जाते. सध्या या दोन्ही विभागाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.आदिवासी विकास महामंडळाकडे गोदामे नसल्याने त्यांचा धान उघड्यावर असतो. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर आवक अधिक असल्याने शेतकऱ्यांचा धानाचा पंधरा पंधरा दिवस काटा होत नसल्याने हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. दरम्यान या धानाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने काही धानाला अंकुर सुध्दा फुटल्याने तो धान खरेदी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर जोपर्यंत धानाचा काटा होत नाही तोपर्यंत त्या धानाची जवाबदारी ही शेतकऱ्यांची असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे दोन्हीकडून शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे.हरभरा, गव्हाचे सर्वाधिक नुकसानजिल्ह्यातील बहुतांश शेतकरी तूर, हरभरा, लाखोळी, वटाणा, करडई, भूईमूंग आदी कडधान्य युक्त पिकांची लागवड करतात. मात्र ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे किडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गहू आणि हरभऱ्याचे सर्वाधिक नुकसान झाले.बहरात असलेल्या तूर पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला असून हे पीक अधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस