शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारूने केले कुटुंब उद्ध्वस्त

By admin | Updated: September 29, 2016 00:16 IST

एखादा असाध्य रोग त्या व्यक्तीला संपविते, परंतु व्यसन हे त्या कुटुंबालाच संपविते. याचे प्रत्यक्ष उदाहरण गोंदियाच्या गोंडीटोला कुडवा येथे पहायला मिळाले.

पती-पत्नी जळीतप्रकरण : ४ वर्र्षांची चिमुकली झाली अनाथगोंदिया : एखादा असाध्य रोग त्या व्यक्तीला संपविते, परंतु व्यसन हे त्या कुटुंबालाच संपविते. याचे प्रत्यक्ष उदाहरण गोंदियाच्या गोंडीटोला कुडवा येथे पहायला मिळाले. पतीच्या दारूच्यामुळे संतापलेल्या पत्नीने स्वत:च आत्महत्या करण्याचा विचार केला. परंतु तिला वाचविण्याच्या नादात दारूड्या पतीचाही मृत्यू झाला. शहारे कुटुंबातील दाम्पत्याचा या घटनेत मृत्यू झाला. यामुळे त्यांची ४ वर्षाची चिमुकली पाच तासात अनाथ झाली. घटनेच्या पूर्वी आई वडीलांच्या लाडीगोडीत वाढणारी चार वर्षाची चिमुकली अवघ्या पाच तासात अनाथ झाली. पतीपत्नीचा नेहमीचा व्यसनासाठी वाद व्हायचा परंतु या व्यसनाने अवघ्या पाच तासात ४ वर्षाच्या ईशीका उर्फ चुटकी हिला अनाथ करून सोडले. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोंडीटोला (कुडवा) येथील चतूर्भुज हगरु शहारे (३५) हा गोंदियाच्या माताटोली येथील एका प्लास्टीक कंपनीत काम करायचा. त्याला दारूचे व्यसन जडले होते. या दारूच्या व्यसनातून त्या पती-पत्नीचे खाके उडायचे. सोमवारच्या सायंकाळी ७.३० वाजता चतूर्भुज दारू पिऊन आला. त्यामुळे कविता चतूर्भूज शहारे (३०) हिने तुम्ही पुन्हा दारू पिऊन आलात यामुळे मी माझी जीवनयात्रा संपविते म्हणून घरात ठेवलेली रॉकेलची डबकी आणली. रिने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली. तिला वाचविण्यासाठी आलेला चतुर्भूजही गंभीररित्या भाजला. त्यांना १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ९ वाजताच्या सुमारास याची सूचना पोलिसांना मिळाली. सहाय्यक फौजदार ईश्वर बोंदरे व हवालदार मनोहर अंबुले यांनी त्यांना केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय गाठले. चतुर्भूजला रूग्णालयात आणताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. पत्नी कविता हिचा मृत्यूपूर्वी बयान पोलिसांनी नोंदविला. पतीच्या दारूच्या व्यसनामुळे कंटाळल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कविताने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या बयानात म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)तहसीलदार, नायब तहसीलदार आलेच नाहीमहत्वाच्या घटनेत मृत्यूपूर्वी बयान तहसीलदाराच्या उपस्थितीत लिहायचा असतो. ह्या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी तहसीलदार हिंगे व नायब तहसीलदार यांना फोनवरून माहिती देऊन बयान घेण्यासाठी बोलावले. परंतु तहसीलदार किंवा नायब तहसीलदार आलेच नाही. कविताचा मृत्यूपूर्वी बयान नोंदविणे आवश्यक असल्यामुळे पोलिसांनी तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी येलम यांच्या साक्षीने तिचे बयान नोंदविले. अन् कविताचा राग अनावर झाला४मृतक कविता सायंकाळी ७.३० वाजता आपली मुलगी ईशिका हिच्यासोबत घरात आनंदात टीव्ही पाहात होत्या. परंतु मद्यप्राशन करून आलेल्या पतीला पाहून कविताला राग आला. या रागात तिने रॉकेल ओतून आत्महत्या केली. सायंकाळी ७.३० वाजता आपल्या आईसोबत आनंदात टीव्ही पाहणाऱ्या ईशीका उर्फ चुटकीला अवघ्या पाच तासात अनाथ व्हावे लागले. या घटनेमुळे समाजमन ढवळून निघाले. एका दारूच्या व्यसनापायी ४ वर्षाच्या चुटकीची पर्वा न करता आई वडीलांनी आत्महत्या केली. यात त्या निर्दोष चुटकीला आयुष्य अनाथात घालवावा लागणार आहे. तिचे संगोपण करण्यासाठी काकांनी आपल्याकडे कुडवा येथे आणल्याचे सांगण्यात आले.