शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गुटख्याचे व्यसन सोडविण्यात अपयश

By admin | Updated: January 14, 2015 23:11 IST

गुटखा सेवन करणाऱ्यांना तोंडाचे आजार होत असल्याने आता त्यावर बंदी आणण्याचा शासनाच्या निर्णय चांगला आहे. तरी या निर्णयाचे परिणामच शून्य असून आता गुटख्याचे व्यसन

इंदोरा बु. : गुटखा सेवन करणाऱ्यांना तोंडाचे आजार होत असल्याने आता त्यावर बंदी आणण्याचा शासनाच्या निर्णय चांगला आहे. तरी या निर्णयाचे परिणामच शून्य असून आता गुटख्याचे व्यसन जडलेल्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. गुटखा बंदीनंतर बहुतांश मोठ्या कंपन्यांनी महाराष्ट्रात थेट गुटखा विक्री कमी केली आहे. त्यामुळे चोरट्या मार्गाने गोंदिया जिल्ह्यात शेजारी राज्यातून गुटखा आयात केला जात आहे. अवैध मार्गाने आयात करणाऱ्यांसाठी हा मार्ग जोखमीचा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच तयार होणारा निकृष्ट गुटखा विकणे सुरू आहे. दीड वर्षापूर्वी गुटखा विक्रीला बंदी करण्यात आली. विक्रीवर बंदी लादली असली तरी उत्पादनावर कोणतेही बंधने नसल्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यात गुटखापुडी सहज उपलब्ध होते. बंदीपूर्वी एक पुडी घेवून गुटखा खाणाऱ्या युवकाच्या माथी आता एकाच वेळी पाच पुड्या मारल्या जातात.साहजीकच खिशात गुटखा पुड्या असल्याने वाटेल तेव्हा तो फाडून तोंडात टाकण्याची सवय वाढली आहे. बंदीपूर्वी गुटखा खाणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी बंद नंतर ती कमी होईल, हा शासनाचा उद्देश्य एकूणच पूर्ण झालेला नसल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. गुटखा खाण्याची अमल आली तेव्हाच पुडी विकत घेण्याची सवय असणारे ५० टक्केपेक्षा अधिक तरूण आणि प्रौढ होते. आता मात्र हेच तरूण दिवसभर पुरेल एवढ्या गुटखा पुड्या एकाच वेळी विकत घेतात. खिशात पुड्या राहत असल्याने कुठेही असो, पुडी विकत घेण्यासाठी जावे लागत नाही. अशा पुड्या घेणाऱ्यांची संख्या ५५ टक्के आहे. गुटखा खाण्याची आठवण झाल्यानंतर पानठेल्यावर जाऊन गुटखा विकत घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच बंदीनंतरही गुटखा खाणे बंद करणे किंवा तंबाखूजन्य पदार्थापासून परावृत्त झालेल्यांची संख्या नगण्य आहे, असे दिसून येत आहे. (वार्ताहर)