शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:54 IST

महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात सिंचनावर विशेष भर देवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : सातबारा वाटप कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात सिंचनावर विशेष भर देवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लघू सिंचन,जलयुक्त शिवार, गाळमुक्त तलाव, तलाव खोलीकरण व पुनरुज्जीवन, मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना, उपसा सिंचन प्रकल्पांना विशेष निधी, भातखाचर दुरुस्ती कार्यक्रम, मग्रारोहयो माध्यमातून रस्ता खडीकरण व तिरोडा शहराकरिता शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन योजनेकरिता २७ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करुन दिला असून प्रत्यक्ष कामाला सुध्दा सुरुवात झाली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने दिलेल्या शब्द पूर्ण केला असल्याचे आ.विजय रहांगडाले यांनी सांगितले.तालुक्यातील अर्जुनी, सेजगाव व कवलेवाडा क्षेत्र अंतर्गत शेतकºयांना सातबारा वाटप कार्यक्रम शनिवारी (दि.२६) पार पडला. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, उपसभापती डॉ. वसंत भगत, जि.प.सदस्या राजलक्ष्मी तुरकर, कृउबास संचालक चत्रभूज बिसेन, तहसीलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, सरपंच कमलेश आतिलकर उपस्थित होते. रहांगडाले म्हणाले, केंद्र सरकारने उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिलांची धुरापासून मुक्तता करुन वृक्षतोड थांबविली. सर्व विभागाच्या योजनांचा प्रत्यक्ष जनतेस थेट लाभ डीबीटीच्या माध्यमातून कसा होईल यावर भर दिला आहे. महसूल विभागाने दिलेल्या निर्णयानुसार शेतकºयांचे सातबारा वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये हस्तांतरीत करुन वर्ग १ चा सातबारा उताºयाचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.