शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मेडिकल इमारत बांधकामाचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला. पण मेडिकलच्या इमारत बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. परिणामी मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच समस्या येत आहेत. मेडिकल कॉलेजचे बरेच विभाग जागा नसल्याने सुरू करण्यास अडचण निर्माण होत आहे.

ठळक मुद्दे६८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर : प्रफुल्ल पटेलांनी पाळला दिलेला शब्द

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील मेडिकल कॉलेजच्या बांधकामाला निधीअभावी सुरुवात झाली नव्हती. बांधकामाला चार ते पाच वर्षे विलंब झाल्याने बांधकामाच्या खर्चात वाढ झाली होती. त्यामुळे इमारत बांधकामात निधीचा अडसर निर्माण झाला होता. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. गुरुवारी (दि.१५) वैद्यकीय शिक्षण विभागाने मेडिकलच्या इमारत बांधकामासाठी ६८९ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाज पत्रकाला प्रशासकीय मंजुरी बहाल केली आहे. त्यामुळे मेडिकलच्या इमारतीचा मार्ग सुकर झाला आहे.गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला. पण मेडिकलच्या इमारत बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. परिणामी मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच समस्या येत आहेत. मेडिकल कॉलेजचे बरेच विभाग जागा नसल्याने सुरू करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांना सुद्धा मेडिकल कॉलेजचा फारसा उपयोग होत नव्हता. मेडिकलच्या डॉक्टर आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. कुडवा परिसरात मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी प्रशस्त जागा मंजूर करण्यात आली आहे, पण काही अडचणींमुळे हे बांधकाम रखडले होते. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्यासह, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीसुद्धा गोंदिया येथे भेट देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होेते. त्यानंतर गुरुवारी (दि.१५) राज्य शासनाने गोंदिया मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. यासाठी ६८९ कोटी ४६ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी निधीदेखील उपलब्ध करून दिल्याने मेडिकलच्या इमारत बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. 

विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा- जगोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांच्या प्रवेशक्षमतेला मंजुरी देण्यात आली होती. आता ती १५० करण्यात आली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा याची मदत होणार आहे.२०० खाटांची संख्या वाढली- जशहरातील कुडवा परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी ६८९ कोटी ४६ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला शासनाने मंजुरी दिली आहे. पूर्वी ४५० खाटांना मंजुरी दिली होती. आता त्यांची संख्या २०० ने वाढवित ६५० खाटा करण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूृर करण्यात आले. मात्र, राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते; जिल्हावासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. आता ६८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने मेडिकलच्या इमारतीचा मार्ग माेकळा झाला आहे.-प्रफुल्ल पटेल, खासदार

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयprafull patelप्रफुल्ल पटेल