शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मुखवट्याआड दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 21:51 IST

भर उन्हाळ्यात भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामध्ये होणार आहे.

ठळक मुद्देदिल्ली ते गल्लीचे निवडणुकीकडे लक्ष : लोकसभा पोटनिवडणूक, प्रचाराचा ज्वर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भर उन्हाळ्यात भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामध्ये होणार आहे. ही निवडणूक जेवढी उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे. त्यापेक्षा ती अधिक या उमेदवारांच्या मुखवट्या आड असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार नाना पटोले यांच्यासाठी महत्त्वाचीे आहे. त्यामुळेच ही पोटनिवडणूक हेवीवेट ठरत आहे. याकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत नजर लागली आहे.माजी खा. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. पटोले यांनी शेतकऱ्यांच्या ज्या मुद्दावर राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला. तसेच पोटनिवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिंगणात उतरण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.ही निवडणूक २०१९ च्या निवडणुकांची नांदी असल्याने ही जागा कायम ठेवणे भाजपासाठी प्रतिष्ठेचे झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुकडे आणि पटले हे उमेदवार असले तरी खरी लढत पटोले आणि फडणवीस यांच्यामध्येच असल्याची चर्चा या मतदार संघात आहे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र सुरूवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. त्यामुळेच या क्षेत्रातून राष्ट्रवादीने मधुकर कुकडे यांना उमेदवारी जाहीर केली.या पोटनिवडणुकीत कुकडे यांच्या विजयासाठी खा. प्रफुल पटेल पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहे. मागील दोन महिन्यापासून या क्षेत्रात सभा बैठकांच्या माध्यमातून पदाकारी, कार्यकर्ते आणि मतदारांच्या संपर्कात आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी कुकडे यांचे नाव ठरविल्याने त्यांच्या विजयासाठी पटेल, पटोले यांच्यासह सर्व नेते मेहनत घेत असल्याचे चित्र आहे. भाजपाने मतदार संघावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा कामाला लावला आहे.नागपुरातील अनेक वरिष्ठ नेते यासाठी या लोकसभा क्षेत्रात तळ ठोकून आहेत. त्यामुळे भाजपाने ही पोटनिवडणूक फार गांर्भियाने घेतल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील एकूण १७ लाख ७० हजार मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यात जातीय समीकरण सुध्दा फार महत्त्वाचे ठरणार आहे. या दोन्ही जिल्ह्यात अडीच लाखांवर पोवार समाजाचे मतदार तर तीन लाखांवर कुणबी समाजाचे मतदार आहेत. तर युवा आणि नव मतदारांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या निवडणुकीचे समीकरण बºयाच प्रमाणात यासर्व गोष्टींवर सुध्दा अवलंबून आहे.या लोकसभा क्षेत्रात आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये या दोन्ही समाजाच्या मतांची फार मोठी भूमिका राहीली आहे. या दोन्ही समाजाची मते घेण्यात ज्या पक्षाचा उमेदवार यशस्वी होईल, त्याचा विजयाचा मार्ग बºयाच प्रमाणात सुकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा वैयक्तीक दाडंगा जनसंपर्क सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.सोशल मीडियावरून आगपखाडभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची सोशल मिडियावर सुध्दा चांगलीच चर्चा रंगली आहे. सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्हॉटसअ‍ॅप व फेसबुकवर एकामेकांच्या पक्षांच्या उमेदवारांची उणे दुणे काढत आहे. तर काहींनी घोषवाक्य सुध्दा तयार केले आहे. ना काँग्रेस ना रॉका आपला ताणू काका, ना इकडे तिकडे आपला भाऊ कुकडे असे घोषवाक्य ही घोष वाक्य सुध्दा मतदारांसाठी मनोरंजनात्मक ठरत आहेत. तर काही कार्यकर्ते विविध कार्टून तयार करुन मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करित आहे.वादळाचा फटकायंदा तापमानात चांगलीच वाढ होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी सभांचे शेड्युल सांयकाळच्या वेळेत ठेवले आहे. मात्र मागील दोन तीन दिवसांपासून तापमानात बदल झाला आहे. रविवार आणि सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास जोरदार वादळासह पावासाने हजेरी लावली. त्यामुळे याचा फटका विविध पक्षाच्या नियोजीत प्रचार संभाना बसला. काही ठिकाणच्या सभा सुध्दा रद्द कराव्या लागल्याची माहिती आहे.प्रचार संभाना गर्दी जमविण्यासाठी दमछाकभर उन्हाळ्यात लोकसभेची पोटनिवडणूक होत असल्याने आधीच मतदारांमध्ये उत्सुकता नाही. त्यातच शेतकरी सध्या खरीप हंगामपूर्व शेतीच्या कामात व्यस्त आहे. तर मजुरवर्ग तेंदूपत्ता आणि मनरेगाच्या कामांवर गेले आहे. त्यामुळे गावात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सामसूम असते. त्यामुळे दुपारच्या वेळेत सभा घेतांना गर्दी जमविताना उमदेवारांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे.जे चार वर्षांत झाले नाही ते दहा महिन्यात होणार का?या लोकसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला केवळ आठ ते दहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे ऐवढ्या कमी कालावधीत या मतदार संघातील विकास कामे, प्रलबिंत समस्या मार्गी लागणार का? असा सवाल सुध्दा मतदारांकडून केला जात आहे. कारण मागील चार वर्षांत या क्षेत्रात जी कामे झाली नाहीत ती दहा महिन्यात पूर्ण होणार का? अशी चर्चा सुध्दा मतदारांमध्ये आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक